◾कविता :- जय जिजाऊ

‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

       🙏विषय :- जय जिजाऊ🙏

       🎋दिनांक:- १२ जानेवारी २०२१ 🎋

💫💠💫💠💫💠💫


एक उरली ठिणगी  

लाख पेटल्या मशाली

स्वराज्याच्या संकल्पनाची

नवीन पहाट आज हि झाली


नवचैतन्याची नवकल्पनांची

आरोळी सुरू झाली

स्वराज्याचा ध्यास घेऊनी

स्त्रियांत तो उतरविला


शान मान महाराष्ट्र उतरूनी

जिजाऊंनी लाख लाख पूत्र

मावळे उभे करूनी आशीर्वादाचे

पारडे जड केले तर या माऊलीने


अशी असावी माता

जिचा वाटावा अभिमान

पूत्र घडवीला ऐसा जो

राष्ट्राची शान मान दान


चंदन प्रेमाने झिजूनी

वंदनात शिथिलता आणली

योगी न होता उपयोग 

आल्यात्या जिजाऊ...


प्रभावा पेक्षा स्वभावाने 

जिंकून दिले महाराष्ट्रला

मर्दमराठ्याना अखंड 

स्वराज्याची सावली


धन्य ती जिजाऊ.....

तुझ्या भेटीची ओढ लागली

अंतरी मस्तक टेकविले मी

तुझ्या चरणावर ती धन्य धन्य

झाला सह्याद्री कनकन 

जय जिजाऊ कोटी कोटी प्रणाम


 सौ कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

 सदस्य मराठीचे शिलेदार समूह 

🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩

जय जिजाऊ जय जिजाऊ

कीर्ती    तुझी   गात  राहू

मातृत्वाचा  अर्थ    गर्भीत

नित   हृदयी  ध्यात   राहू

चाकरी  ना  मान्य  आम्हां

स्वबळावर   गर्जत    राहू

स्त्रीपणाचा  बाणा जपूनी

संस्कारांना   जागत   राहू

जय जिजाऊ.........

शिवशंभूंची प्रतिमा पाहून

पीढी  अमुची घडवत राहू

विनम्रतेसह कण्खरता ही

रक्तामध्ये   मिसळत  राहू

जय जिजाऊ.........

प्रसंगावधान  राखून सदा

निर्णय  अचुक  घेत  राहू

लहान थोरास समभावाने

आदर्श वागणूक देत राहू

जय जिजाऊ.........

जातीपाती  धर्म नि भाषा

बंधनं  सारीच मोडत राहू

कुप्रथांची शृंखला तोडीत

प्रगतीपथावर चालत राहू

जय जिजाऊ........

कर्तृत्वाचा   ध्वज  आम्ही

आसमंती   फडकत  राहू

अन्यायाचे  तोडून  लचके

अभिमानाने  मिरवत राहू

जय जिजाऊ.........


 मीता नानवटकर नागपूर

 सदस्या मराठीचे शिलेदार समूह


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


आधी नमन भवानी मातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना...॥


करून वंदन राजमातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना...

करून त्रिवार मानाचा मुजरा

जय जिजाऊ आऊ साहेबाना....


आधी नमन भवानी मातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना...॥


सिंदखेडराजा गावाला 

गिरीजाबाई लखोजी जाधवला ...

देवीचा चमत्कार हो झाला 

मी येणार हो तुम्हच्या घराला ...


आधी नमन भवानी मातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना...॥


निश्चयाची महामेरू रूप तेजस्वी

कन्यारत्न प्राप्त झाले जाधव घराण्याला ...

स्वराज्यप्रेरीका आत्मविश्वासू

स्वराज्यजननी आल्या जन्माला ...


आधी नमन भवानी मातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना...॥


वेरूळच्या भोसले घराण्यात

शहाजीराजे शी विवाह झाला...

शिवनेरीवर ठेवून जिजामातेला

गेले निघुन वतनावर विजापूराला...


आधी नमन भवानी मातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना...॥


फाल्गुन वद्य तृतीयाला शिवनेरी

स्वराज्य रक्षक जन्मला घातला...

देवी शिवाई वरून नाव शिवाजी ठेवले

चांगले संस्कारात वाढवल राजाला...


आधी नमन भवानी मातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना...॥


स्वराज्य स्थापनेची शपत

घ्यायला लावून शिवबाला...

स्वराज्याची रचली गाथा

रयतेचा राजा बनवल शिवबाला...


आधी नमन भवानी मातेला

जय जिजाऊ आऊ साहेबाना

 विजय शिर्के , औ. बाद .

 © सदस्य मराठीचे  शिलेदार समूह ... 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


मातांमध्ये श्रेष्ट तू

तुझी गावू मी कीती महती

स्वराज्य निर्माता दिला आम्हास

दाही दिशी ज्याची ख्याती


वर्ण भेदाला  तडा देऊनी

निर्मिले नवे राष्ट्र

शिवरायांच्या स्वराज्य प्रांतात

नांदती सर्व बिनधास्त


तव संगोपनाने दिला आम्हा

जिवंत अमर देव

रयतेची सूख समृद्धी

हिच स्वराज्याची ठेव


नाव तुमचे येता ध्यानी

अभीमान मनास वाटे

जय जिजाऊ जय जय जिजाऊ

मग मन हेची गाते


 नितीन तुपलोंढे 

 *गंगापुर जि. औरंगाबाद* 

 *©सदस्य मराठीचे शिलेदार समुह* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


दिली स्वराज्य रक्षणासी 

शिवबास हाती तलवार

 तरबेज केले त्यासी

 होण्या स्वराज्यावर स्वार 


धन्य ती जय जिजाऊ माता

गाऊ तिची अपरंपार गाथा

 चला वंदन करूया आता 

टेकुनी चरणी माथा


 शब्दांचे भांडार प

 शिवबाला जिजाऊंनी घडविले

 भूषविण्या त्यासी छत्रपती 

दिनरात झटली ती दात्री


जय जिजाऊ माता

जय शिवराय 

धन्य तो महाराष्ट्र ज्यांनी पाहिले

 असे लेक नी माय


 *मिलन डोरले/मोहिरे पुणे* 

 *सदस्या मराठीचे शिलेदार समूह*


💫💠💫💠💫💠💫💠💫💠💫


'स्वभूमी' ही जरी आपुली

होती 'मर्जी' इथे दुसऱ्यांची...

स्वाभिमानाची जागृत देवता 

पहा ती पाने इतिहासाची...


स्वराज्याचा सूर्य जन्मला

 मातेच्या त्या उदरातून....

अखंड निनाद तलवारींचा

घुमघुमला याच मातीतून...


स्वाभीमानाचा सुगंध प्रखर

दरवळला येथे सह्याद्रीगिरी .....

परकियांची गुलामी कोठवर?

शब्द निनादले रायरेश्वरी......


माता आणि माती एकच 

रगतात स्वाभिमान पेरला....

मग एक मावळा शिवबाचा

शत्रूस शंभर पुरून उरला....


'आत्मभिमानी' खणखणले

 आई तुझीच किमया ही ....

स्वराज्याचा चंद्र कोरून

धन्य जाहली ती शिवाई....


करून एक सूर अनेक

यारे या सारे आज गाऊ....

'एकात्मता' या भूमीची

जय जिजाऊ जय जिजाऊ...


*नरेंद्र बनकर अर्जुनी/ मोर.* 

 *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


शिवाबाची कुस जन्मली

सिंदखेडला शुर कळी उमलली

हिंदवीस्वराज्य जन्माला आला 


स्वराज्याची धगधगती ती मशाल

छत्रछायेत गुलामीची बिमोड झाला


दुधात पाजली ऐसी स्वराज्याची झिंग

देखुनी मुघलराजा हि हैराण झाला


सळसळवली कंगणी तिन तलवार

सह्याद्रीचा शिव सुर्य जन्मा घातला


दिधले गुरुज्ञान ऐसा शिवबाळा

हिदंवी स्वराज्याचा धडा गिरविला


नेत्री तृप्त झाली माय माऊली

सह्याद्रीत जय जिजाऊ जयघोष झाला 


पाचडगावी सुखे समाधी निजली

ह्या चंदनदेही धन्य स्वराज्य झाला


 *सौ वर्षा जमधडे VSJ(नाशिक)* 

 *मराठीचे शिलेदार समुह सदस्य* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


चला  वंदन करु 

माॅ जिजाऊं चरणी

जन्माने तिच्या

हर्षित झाली धरणी


प्रजेची स्वप्नपुर्ती करण्या

शुर शिवबा घडविले

मावळ्यांच्या साथीने

भल्याभल्यांना हरविले


देह झिजवुन सारा

दिले कर्तबगार चंदन

माॅ  जिजाऊंच्या

चरणी करूया वंदन


स्वराज्याची घडी

जिजाऊने बसवली

एकटीनेच जिद्दीने

खिंड लढवली


कन्या जाधवांची

भोसल्यांची सुन शोभली

स्वराज्य निर्मितीस

माॅ जिजाऊ झिजली


माॅ साहेबांचा

होता करारी बाणा

म्हणुनच ताठ होता

स्वराज्याचा कणा


घ्यावा आदर्श सर्वांनी

माॅ जिजाऊंच्या विचारांचा

करू जयघोष आजला

जय जिजाऊ,जय शिवराय.


*चव्हाण बी.एम.सेलु.परभणी*

*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


राजमाता जिजाऊ साहेब

अशी ख्याती अजरामर

दाही दिशाची मुलूख 

रणरागीणी ती धुरधंर...


संकट समयी करुनी

शत्रू संगे सामना

लई भारी पडला

 तलवारीचा बाना....


पोटी पुत्र शिवबा

लढायला केले उभा

देऊनी तया शिक्षण 

गडकिल्ले ,मावळ्याची सभा...


कल्याणकारी जनतेचे

स्वराज्याची घेऊन शपथ

शिवबा छत्रपती राजा

सिंहासन आरुढ रथ....


अशी जगी माता 

गुणगाण गाऊ किती

आधुनिक युगात

स्त्रीला येऊ दे गती....


 *शिवाजी नामपल्ले(सहशिक्षक-विज्ञान)* 

 *अहमदपूर जि.लातूर* 

 *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह..* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


शुरविर मर्दानी माता 

जन्मली महाराष्ट्राच्या भूमीवर 

पावन झाली धरती 

धन्य पावले मराठे थोर 


भोसले घरान्याची शान 

जगमगती हिऱ्याची खान 

रचली स्वराज्याची गाथा 

जगी तिचा मान सन्मान 


पोटी पुत्र जन्मले महान 

तो रयतेचा जाहला राजा 

नाव शोभिवंत छान 

शूरवीर शिवबा महाराजा 


तेजोमय दिव्य राजमाता 

नमन तुमच्या विरतेला 

करीते वंदन शतशत 

मानाचा मुजरा जय जिजाऊला 


 *सौ पुष्पा डोनीवार* 

 *चंद्रपूर* 

 *सदस्या मराठीचे शिलेदार समुह* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


श्रद्धास्थान स्त्रियांचे

वीरतेची साक्षात मुर्ती

जिजाऊमुळे जगी वाढली

महाराष्ट्राची किर्ती


सिंदखेडच्या जाधवांची कन्या

भोसले कुळाची लक्ष्मी झाली

सुवर्णयुगाच्या स्वप्नाची जणू

मुहूर्तमेढच वेरुळात रोवली


साथ शहाजीराजांची लाभली

ऐश्वर्य,सुबत्ता जीवनी आली

त्यागून ऐहिक सुख,ऐश्वर्य सारे

जिजाऊ पुणे प्रांती स्थित झाली


जन्म दिला शिवनेरीवर

स्वराज्यसंस्थापक शिवबांना

सह्याद्रीचा सिंह गर्जता

घाम फुटला सुलतानांना


शिवबांना बालपणापासून दिले

अनमोल संस्कार अन् धडे शूरतेचे

बळ दिले लढण्याचे विरोधात अन्यायाच्या

अन् डोळ्यात स्वप्न स्वराज्यस्थापनेचे


स्वराज्य उभे करण्यास पाठीशी

उभ्या खंबीरपणे जिजामाता

येवोत कितीही बलाढ्य शत्रू

नाहीच जिवंत राहणार आता


बनून जिजाऊ प्रत्येक मातेने

पुन्हा घडवा शिवबा घरोघरी

होईल रक्षण स्त्रीशीलाचे अन्

आदर,सन्मानाने राहतील नारी


नमन माझे वीरमाता जिजाऊंना

आजच्या पावन संस्कार दिनी

घडवू पुढची पिढी शिवबापरि संस्कारी

पुन्हा नांदेल स्वराज्य आपल्या जीवनी


 *प्रतिभा बोबे,* 

 *राहुरी, अहमदनगर* 

 *© सदस्या मराठीचे शिलेदार समूह* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ* (पाळणा)


बारा जानेवारी

सोनियाचा दिस

म्हाळसाबाईने

दिला जन्म लेकीस

 *जय जिजाऊ जय ....२* 


लहानपणीच

लग्न त्यांचे झाले

शहाजी भोसले

पती ते शोभले

 *जय जिजाऊ जय ....२* 


स्वाभीमानी आऊ

पतीनिष्ठ प्रखर

कर्तव्ये प्राधान्ये

त्यागीला माहेर

 *जय जिजाऊ जय ....२* 


राजकारणात

होत्या त्या निपुण

बाळ शिवाजीस

केले सक्षम तिनं

 *जय जिजाऊ जय ....२* 


शिवरायावर

करूनी संस्कार

स्वप्न स्वराज्याचे

केले ते साकार

 *जय जिजाऊ जय ...२* 


तव त्यागानेच

सुखी सर्वजण

राष्ट्रमातेस त्या

त्रीवार वंदन

 *जय जिजाऊ जय ...२* 


 *किशोरकुमार बन्सोड* 

                *गोंदिया* 

© *सदस्य मराठीचे शिलेदार समूह*


💫💠💫💠💫💠💫💠💫💠💫


 *🚩 कविता समुह ७ 🚩*


💫💠💫💠💫💠💫💠💫💠💫


 *जय जिजाऊ....*


शिवरायांची थोर माता

कुलवंत जय जिजाऊ 

लेक लखूजी जाधवांची

होती शिवबांची ती आऊ...


सून भोसले घराण्याची

शिवभक्त मालोजीराजांची

भार्या होती जिजाबाई

शूरवीर शहाजीराजांची....


जिजाईने शिवबांच्या मनी

स्वराज्याचे रोप लावले

खतपाणी घालून मूल्यांचे

रोपास मनी  खोल रुजवले....


सुसंस्काच्या परिणामकारक कथा

जिजामातेने शिवबांना सांगितल्या

मावळ्यांच्या साथीने शिवबांनी

कथा सत्यात हो उतरवल्या....


साधूसंताची चरित्रे कथन केली

पराक्रम ऐकवले शूरवीरांचे

शिवबाने घोडदौड सुरू केली

स्वप्न  सत्यात आणले स्वराज्याचे....


     *वसुधा नाईक,पुणे*

*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


जय जिजाऊ माता

धन्य माऊली झाली

स्वराज्य शिकवण

तिने शिवबाला दिली !!


घडविले शिवबाला

शूरवीर बनविले

शहाजी जिजाबाईंचे

 शिवबा पुत्र शोभले !!


स्वराज्यासाठी घेतली

होती शपथ शिवबांनी

मिळविण्यासाठी केले

होते जिवाचे रान त्यानी!!


थोर ती जिजाऊ झाली

थोरवी तिची गाऊया

शूर शिवबाची आई

शूर मातेला वंदू या !!


 *✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे) म्हसवड नं २* 

 *कुकुडवाड या माण जि सातारा* 

 *सदस्या मराठीचे शिलेदार समूह.* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


थोर अद्वितीय साहसाचे

मातृत्व लाभले राष्ट्राला

चंद्र सूर्य धरती नि अंबर

आले उधाण सागराला

गुणगान आपण गाऊ

राष्ट्रमाता जय जिजाऊ...!!


लेक धाडसी जाधवांची

वीर पत्नी शहाजीराजांची

शर्थ तुमच्या पराक्रमाची

होती साठवण ममत्वाची

चरणधूळ कपाळी लावू

राष्ट्रमाता जय जिजाऊ...!!


अठरापगड जातीजमाती

सवंगडी होते शिवबाचे

जणू गळ्याचे ताईतच

होते माऊली जिजाऊंचे

इतिहास विश्वात पसरवू

राष्ट्रमाता जय जिजाऊ...!!


स्वराज्याचे बीजारोपण

घडविले शूर शिवबाला

आजही उणीव तुमची

भासते अवघ्या देशाला

पराक्रमाचे पोवाडे गाऊ

राष्ट्रमाता जय जिजाऊ...!!


*✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड*  

 *कवयित्री/लेखिका/सदस्या* 

 *मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 जिजाबाईने आपली सारी शक्ती

पणाला लावून हिमतीने लढली

 एक तेजस्वी महिला जय जिजाऊ

महाराष्ट्राची दिव्यजोती ठरली।


शूरवीर राष्ट्रमाता तुझीच पुण्याई

रयतेची बणले शिवराय सावली

शिवबाला पराक्रमी तूच घडवलस 

असी तू राजमाता जय जिजाऊ माऊली।


राजमाता जिजाऊंची दूरदृष्टी 

स्वराज्याचा होता मुलमंत्र

तोरण बांधण्या शिवबाला 

स्वराज्याचे दिले हाती सुत्र।


प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात

अभिमान जिजाबाईने जागवला

आपल्या शिवबालाही ज्ञान देऊन

 रयतेचा सच्चा न्यायदाता बणवला।


*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*

*मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


माझी जिजाऊ माऊली

 नमन तुझिया चरणी

तूच स्वराज्याची सावली

नि स्वातंत्र्याची स्वामिनी


नव्हती मान्य गुलामी

न मानले जाती धर्माला

फुंकर घालून दुःखाला

वागविले समतेने प्रजेला


जीवापाड जिजाऊ मातेने

स्वराज्य ठेवा जपला

करून थोर संस्कार

घडविले बाळ शिवबाला


जय जिजाऊ माऊली

अशी दिव्य तुझी कीर्ती

देऊन सत्वगुणांचे धडे

बनलीस शिवबाची स्फूर्ती


जय जिजाऊ गाऊ गाणं

बाळगू प्रति अभिमान

दिधले स्वराज्याचे दान

जिजाऊंचे कार्य महान


 *©️सौ संगीता म्हस्के पुणे*

 *सदस्य मराठीचे शिलेदार समूह* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


दार उघड बये ,दार उघड

सांगितले भवानी मातेला

कर दूर अन्याय अत्याचार

साकडे घातले देवीला


रणरागिणी ती कंटाळली

होती मुघली सत्येला

वडिलांचा वध लागला होता

जिव्हारी तिला


महाराष्ट्राची भूमी भिजत होती

रक्तानी

आया बहिणीची अब्रू होती

वेशीला टांगली मुघलांनी


दुसऱ्यासाठी शक्ती जात होती वाया

तेव्हाच माऊलीची थरथरली काया

महाराष्ट्र धर्माचे रक्षण कराया 

जन्मला शिवबा धर्म रक्षाया


दिले धडे माऊलीने शिक्षणाचे

 बाळकडू पाजले स्वाभिमानाचे

धन्य शिवराय जाहले

घडले पुत्र जिजाऊंचे


स्वन केले पूर्ण मायमाऊलीचे

धन्य जाहली महाराष्ट्र भूमी

दुमदुमली नभी, जय जिजाऊ

जय शिवराय घोषणांनी



*सौ.शशी मदनकर,ब्रम्हपुरी*

*सदस्या-मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


जय जिजाऊ हा मंत्र महान

स्वराज्य संकल्पक स्फूर्तिस्थान

 

अन्यायाच्या मनात नित्य

उफाळल्या धगधगत्या ज्वाळा

प्रसंगी शस्त्र घेतले हाती

असहाय रयतेच्या प्रतिपाळा


माणूसकीचा मागमूस ना कुठे 

प्रतिकूलता अवघी जिकडे तिकडे

धर्मरक्षणार्थ अन राष्ट्ररक्षणार्थ

प्रश्न मनी घालावे कोणा साकडे


स्वराज्य अन सुराज्य निर्मिण्या

आत्मनिर्णयाच्या तत्त्वा अंगिकारले

सत्कार्यास्तव मावळे मावळणी

निर्विकल्प मनाने कामी आणिले


बुरसटलेल्या प्रथा परंपरांना

दिलीस लीलया तिलांजली 

स्वीकारून विज्ञाननिष्ठ दृष्टीस

समताधारीत समाजरचना केली


न्यायनीतीचे घालवून दिलेस

कर्तव्यदक्ष आदर्श उदाहरण

कठोर शिक्षा सुनावल्या प्रसंगी

अत्याचारी टाकिले चिरडून


मानव संघटन कसब अजब

समाजमनात रुजला आदरभाव

स्वराज्याच्या महायज्ञात मग

समान लढला रंक आणि राव


जगतावरी ठसा उमटला जरी

महानतेचा महामेरू अलिप्त

महान छत्रपती राखण्या तख्त

शिव शंभू घडविले सशक्त


आदर्श कन्या पत्नी माता

कुशल राज्यकर्ती अन प्रशासक

ऐसी विभूती पुन्हा होणे नाही

मानवता धर्माची आदर्श पूजक


शत्रूंनीही धसका घ्यावा असे

प्रस्थापिले करारी अन शूरपण

जय जिजाऊ हा मंत्र महान

स्वराज्य संकल्पक स्फूर्तिस्थान


*डॉ. पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद*

*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


राज माता जिजाऊ

गाण  किती गाऊ

पुत्र आपण घडवले

 स्वराज्यच निर्माण केले.. १


शूर विरतेच्या कथा

ऐकवल्या अनेक गाथा

सत्कर्म करत राहवे

परस्त्रीला मायसमान  वागवावे. २


मुघलांचे रयतेवर  अत्याचार

वाढत राहिले वारंवार

मनाची अस्वस्थता व्हायची

शिवबाला युद्धकला शिकवायची३

   

आई जिजाऊच्या उपदेशाने

शिवबांना हुरुप येई

वीर अन्यायाशी  लढले

तसेच आपण लढत राहावे. ४


घडत राहिले शिवबा

शत्रूशी झुंज देणें

गनिमी कावा रचने

अन् किल्ले काबीज करणे. ५


जिजाऊचे परीश्रम कठोर

आदर्शमाता जगात थोर

तुम्हासारखे  घडने  नाही आता

जय जिजाऊ आम्ही गाता. ६


 (सौ.राजश्री विकास ढोबळे पाटिल अरण्येश्व विद्या मंदिर पुणे ९) 

सदस्य मराठीचे शिलेदार समूह ©




♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖


           *🙏संकलन/सहप्रशासक🙏* 

             *✏श्रीमती सुधा अश्वस्थामा मेश्राम*

            *ता. अर्जुनी /मोर, जि. गोंदिया*

                  

 *©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*


➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

[13/01, 6:48 pm] +91 75887 71429: https://chat.whatsapp.com/D1MnWPKYxPI6pxrSYJ5mX8


➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖

*✏कविता समूह क्र १ व २ चे संकलन*

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

    *📚'मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ📚*

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

*‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.*‼

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

*मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*🚩

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾


       *🙏विषय :- जय जिजाऊ🙏*

       *🎋दिनांक:- १२ जानेवारी २०२१ 🎋*


♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾


💫💠💫💠💫💠💫💠💫💠💫


 *🚩 कविता समुह १ 🚩* 


💫💠💫💠💫💠💫💠💫💠💫


 *जय जिजाऊ* 


तो काळ कसला महाकाळच जीवावर उठला

अख्खा देश पातशहांनी हिश्यात वाटून घेतला

अन्याय  अत्याचाराला  सीमाच उरली नव्हती

परिस्थितीपुढे मर्द मराठा सुद्धा शरमेने झुकला


मंदिरातले देव दगड-माती ढासळून गेली होती

दुष्ट दुर्जनी जालीम सत्ता छातीवर बसली होती

शब्द मुके कुणाचीही बोलायची हिम्मत नव्हती

आया-बहिणींची अब्रू तर पार लुटून गेली होती


भाग्य आमुचे जाधव घरात लेक जन्मास आली

जगात साऱ्या राजमाता जिजाऊ प्रसिद्ध झाली

अवतीभवती  दैत्य  माजले  संकल्प  थोर केला

घेऊन शस्त्रे  आपुल्या  हाती महाकाली धावली


बाळ शिवाजीस सांगून गोष्टी मायेने  घडविले

उत्तम शिक्षण सुसंस्कृत अलंकारांनी सजविले

कृष्ण  अर्जुन  भीम पराक्रम बाळकडू पाजले

सह्याद्रीचा  शेर शिवाजी नाव सर्वत्र दुमदुमले


जमवून बालगोपाळ सारे  सैन्य डेरा उभा केला

स्वराज्याचा महान संकल्प शिवबाला सांगितला

शपथ घेतली स्वराज्याची एक मुखी नारा दिला

शत्रूच्या  उरात धडकी  एक एक गनिम टिपला


सह्याद्रीची कुस उजळली आनंदाचा क्षण आला

हर हर महादेव  करून गर्जना भगवा फडकला

राजमाता जिजाऊ चा संकल्प पूर्णत्वास आला

तो बाळ शिवाजी आमुचा राजा छत्रपती झाला



                *नंदकिशोर रावसाहेब कदम* 

                *ता.उमरखेड जि.यवतमाळ* 

 *सदस्य मराठीचे शिलेदार समूह* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ* 

                     

मुजरा मानाचा 

        जिजा माऊलीस

मुक्तीचा आदर्श 

        दाखवी आम्हांस


पराक्रमी निश्चयी

         दूरदर्शी संस्कार 

दुर्जना फोडे घाम

         सत्यार्थी तलवार


भयभीत मनात 

         पेटवलीस ज्वाला 

धडावेगळे हात

         जर स्त्रीदेही घाला


जय जिजाऊ हा

         ध्वनी गुंजतोय

जन्मोत्सवदिन

         पोवाडा गातोय

         

जय जय जय 

         जय माॕ जिजाऊ 

माथा टेकवून 

         स्फुर्तीगीत गाऊ 


✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*

          *मु.पो.कुमठा (बु.)*

    *ता.अहमदपूर जि.लातूर*

*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*

*©️मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ* 


तिच्या पराक्रमी बाण्याने  

घडविले शिवबाला 

स्वबळावर खेचून आणले

रयतेसाठी स्वराज्याला 


तिचा करारी स्वभाव 

अन्  मायाळू वृत्ती 

साधूसंताच्या कथा सांगून 

घडविली महान संस्कृती 


गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी 

शिवबाची होती गुरू

स्वराज्य रक्षणाची जबाबदारी 

तेथून झाली सुरू


धन्य ती जिजाऊ माऊली 

होती शिवबाची सावली

गाथा तिची सार्या नी गायली

जिजाऊच्या चरणी आत्मसुमने वाहिली


 *सौ अर्चना गणेश लाळगे ता इन्दापूर जि पुणे*

 *सदस्य मराठीचे शिलेदार समूह*


💫💠💫💠💫💠💫💠💫💠💫


 *🚩 कविता समुह २ 🚩*


💫💠💫💠💫💠💫💠💫💠💫


 *जय जिजाऊ*


फक्त एका श्वासाचं अंतर

जय जिजाऊ उच्चारताना

त्यांनी अवघा श्वास वाहिला

शूर शिवबाला घडविताना


नसत्याच शूरवीर जिजाऊ

शिवबाही घडलेच नसते

गुलामगिरीच्या बेड्यांतूनी

प्रजाजन कसे सुटले असते..?


शूर पित्याची शूरवीर कन्या

पराक्रमी शहाजींच्या भार्या

दोन्ही कुळांचे नाव गौरविले

शिवबास लावून राज्यकार्या


कशी गावी थोरवी जिजाऊ...

ओठातले शब्द अपुरे पडतात

श्वास वेचले तुम्ही स्वातंत्र्यासाठी

तेव्हाच शिवबांसम पुत्र घडतात


*🚩( थोर राजमाता जिजाऊ भोसले यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन....!)🚩🙏*


*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*

*कवयित्री/लेखिका*

 *सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*

 *©मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ* 


धैर्य आणि खंबीरपणा

रोमरोमी तुझ्यात वाही

आदर्शाचे सगुण रूप तू

स्वाभिमानी माता जिजाई


पारतंत्र्याच्या जाचातून

मुक्त करण्या रयतेला

बाळकडू स्वातंत्र्याचे पाजून

घडविले बाणेदार शिवबाला


शुरविरांच्या कथा सांगून

जागविले तू शौर्याला

सुसंस्काराचे शिंपण करून

जनसेवे घडविले शिवबाला


मातृत्वशक्ती अगाध तुझी

स्वातंत्र्यास्तव प्रेरक अशी

सत्य,न्याय,निती राखण्या

स्वप्नपूर्ती हिंदवी स्वराज्याशी


तूच शक्ती,तूच भक्ती

तूच श्वास बनली शिवबाचा

हिंदवी स्वराज्य स्थापून शिवबाने

सार्थ केला धडा आदर्शाचा


जय जिजाऊ,स्वराज्यजननी

अगाध शक्तीची नारायणी

आदर्श तुझा मातृत्वशक्तीला जगी

नमन आदरे तूज जयंतीदिनी


 *श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे* 

 *साईनगर,अमरावती* 

 *सदस्या,मराठीचे शिलेदार समूह* 


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ*


तोडून गुलामगिरीच्या बेड्या

मनी जागविलीस आशा...

अंधारल्या कोठडीत रयतेच्या

मग उगवली उषा...!!१!!


हिंदवी स्वराज्याला देवून

तुझ्या संस्काराचा पाया...

रयतेच्या राजावर धरलीस 

तू सदैव छत्रछाया...!!२!!


परस्री असे मातेसमान

हे तूचं मनी रूजविले...

स्वराज्यातील स्रियांनी

शिवबाला देव्हाऱ्यात पुजिले...!!३!!


पोटी तुझ्या जन्मला 

जणू तेजाचा अविष्कार...

जपण्या हिंदुत्व केलेस

तू संभाजीवरही संस्कार...!!४!!


टेकवून माथा करते जिजाऊ

त्रिवार मुजरा तुला...

निर्मिण्या स्वराज्य तू

रयतेचा राजा घडविला...!!५!!


*माधुरी गुरव ( निळकंठ ) बीड*

*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ*


जिजाऊची लेकरं आम्ही

कणखर आमचा बाणा...

मोडेन पण वाकणार नाही

ताठ आमचा कणा...


जिने घडविले छत्रपती

त्या मायेची मी लेक... 

फेकू नगा नजर वाकडी

नाय तर काढेन मी बाक.


कर्मठ विचारांवर आऊने

जसा केला वज्र प्रहार..

स्वार होऊनी अश्वावर

चालवीन मिही समशेर..


प्रारब्धापुढे कधी ना

घालणार मी लोटांगण..

पंखात माझ्या तुझाच अंश

सर करेन नभांगण..


सळसळते रक्त अंगी अन्

नजरेत जळतो  अंगार..

न्याय हक्काच्या लढाईत

खोचते कटी मी पदर..


संस्कारांची तुझी शिदोरी

पदोपदी करीते स्मरण...

आली जरी किती संकटे

जात नाही कुणा शरण...


पुन्हा पुन्हा तू येई जन्मा

लेक मी तुझीच बनेन...

दावीला तू जो राजमार्ग

तयावरीच मी चालेन....


पवित्र दिनी तुजला माते

घे स्विकारून मज मुजरा...

तूज चरणाप्रती सदैव या

खिळून राहती मज नजरा...


जय जिजाऊ हा मंत्रमुखी

सदैव तुझाच नाम घोष...

चालवूनी तुझा वारसा

जपलाय ज्ञानाचा कोष...


*सौ.सविता पाटील ठाकरे.*

*सिलवासा दादरा नगर हवेली.*

*©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ*


राजमाता जिजाऊ तुमच्या स्मृतीत

आज पेटल्या असंख्य ज्योती

तुम्ही घडविले या देशासाठी

राजे शिवाजी  शूर छत्रपती


आदराने झुकतो माथा

जय जिजाऊ उच्चारताना

किती कष्ट साहिले होते

राजे शिवाजी घडवितांना


तुम्हीचं शिकविले शिवबाना

अन्याया विरुद्ध लढायला

स्रियांचा आदर करणे

आणि न्यायात वागायला


राजमाता जिजाऊ तुमच्यामुळे

रयतेचा राजा आम्हा मिळाला

स्वराज्याचा खरा अर्थ

आम्हा तुमच्या मुळेच कळाला


कशी मांडू मी शब्दात

तुमच्या शौर्याची गाथा

इवलंस मी पामरं

झुकविते तुमच्या चरणी माथा


*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*

*सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*


🚩🏇🚩🗡️👑⛲👑🗡️🚩🏇🚩


 *जय जिजाऊ*


सिंदखेड राजाच्या राजमहाली

अद्वितीय कन्या जन्मास आली

युद्धकलेत राजनीतीत निपुण

कणखर बाणा मूर्ती साकारली. 


जय जिजाऊ स्वराज्यमाता

साहसी त्यागी अन् करारी

छत्रपती शिवबाला घडविले

प्रतिभाशाली उत्त्तम संस्कारी.


स्वराज्यनिर्मिती हीच आस

स्वप्नपूर्तीचा अहोरात्र ध्यास

उरात प्रचंड आत्मविश्वास

सामोरी गेली हर संकटास. 


गरीबांप्रती प्रचंड तळमळ

नारी हक्क रक्षणार्थ दक्ष 

रयतेच्या सुख समाधानावर

जातीने ठेवले कायम लक्ष.


शहाजीराजांची आदर्श पत्नी

पुत्ररत्न शिवा संभा ढाणे वाघ

सुसंस्कारांनी फुलविली त्यांनी

हिंदवी स्वराज्याची सुवर्ण बाग.


कर्तव्यकठोर आणि नैतिकता

माऊलीची अगाध जीवनगाथा

अभिमानाने उर दाटून येतो 

झुकवितो पायी विनम्र माथा.


प्रखर मुत्सद्दी  जिजाऊंना

आज करू मानाचा मुजरा

प्रत्येक नारीस प्रेरणादायी 

 आदर्श जपूया हाच खरा...


शिवराज्याभिषेकाचा सोहळा 

जिजाऊंनी डोळे भरून पाहिला

आणि अवघ्या बारा दिवसांनी

समाधानी देह अंतर्धान पावला.


✍️ *सौ.सुजाता सोनवणे*.

*सिलवासा दादरा नगर हवेली.*

*सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*


♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖


           *🙏संकलन/सहप्रशासक🙏* 

             *✏श्रीमती सुधा अश्वस्थामा मेश्राम*

            *ता. अर्जुनी /मोर, जि. गोंदिया*

                  

 *©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*


➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

🏹 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !