सर्व आरत्या

*1) || श्री गणपतीची आरती ||*

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||🔺

लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||



*2) || श्री विठोबाची आरती ||* 

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं।
कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां।
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती।
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥













*3)|| नवरात्री आरती ||* 



आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ॥
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ॥
मूलमंत्रजप करुनी भोंवते रक्षक ठेउनी हो ॥
ब्रह्माविष्णुरुद्र आईचें पूजन करिती हो ॥ १ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो॥
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥
ध्रु०॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ॥
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ॥
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ॥
उदो० ॥ २ ॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ॥
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ॥
कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ॥
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥
उदो० ॥ ३ ॥

चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक जननी हो ॥
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ॥
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ॥
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणीं हो ॥
उदो० ॥ ४ ॥

पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो ॥
अर्थ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ॥
रात्रीचे समयीं करिती जागरण हरिकथा हो ॥
आनंदें प्रेम तेंआलें सद्भावें क्रीडतां हो ॥
उदो० ॥ ५ ॥

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ॥
घेउनि दिवट्या हस्तीं हर्षें गोंधळ घातला हो ॥
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळां हो ॥
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥
उदो० ॥ ६ ॥

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायनी हो ॥
सह्याद्रीपर्वतीं पाहिली उभी जगज्जननी हो ॥
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ॥
स्तनपान देउनि सुखी केलें अंतःकरणीं हो ॥
उदो० ॥ ८ ॥

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ॥
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ॥
षड्रस‍अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ॥
आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरुनी हो ॥
उदो० ॥ ९ ॥

दशमीच्या दिवशीं अंबा निघे हो ॥
सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेउनी हो ॥
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ॥
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ॥
उदो० ॥ १० ॥











*4) || श्री शंकराची आरती ||* 



लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा।
वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुन्दर मस्तकी बाळा।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें।
त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें।
नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुळटिळक रामदासा अन्तरी॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...