काय सांगू दादा, तुला दारुड्याची दशा, आंबील घेऊन बसतो, नी बुडवितो मिशा... दारुड्याला नाही, कुणी घालत भीक, त्याच्या पासून काही तरी, तू धडा शिक... नाही देत त्याला अन्न, नाही ठेवत भरवसा, उखळात घालून तोंड, भरून घेतो घसा... बनतो हा राक्षस सणा-सुदाच्या दिशी, बायको मुले जेवून, राहे हा उपाशी... थोडीशी पिऊनी, डरकाळ्या फोडतो, नशा चढली की, नालीत लोळतो... नशेच्या धुंदीत, मारतो बढाया खूप, पूजेला नाही मिळत, अगरबत्ती नि धूप... रुपेश शामसुंदर आक्केवार गडचिरोली