शिव / मल्हार प्रतिष्ठान नंदनशिवनी

शिव प्रतिष्ठान नंदनशिवनी












.  *➰  तुम्हाला माहीत आहे का? *



_*‼“छत्रपती शिवाजी” सिनेमाला काश्मीरमध्ये बंदी घातली होती? ‼*_




    *१९५२ साली आलेला भालजी पेंढारकर यांचा छत्रपती शिवाजी सिनेमा हा त्याकाळी तुफान गर्दी गोळा करीत होता. महाराष्ट्रात तर तो गाजलेला होताच पण छत्रपती शिवरायांच्या कार्याचं आकर्षण उभ्या भारतात असल्यामूळ ‘छत्रपती शिवाजी’ हा संपूर्ण देशात हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला.*
सगळीकडे या सिनेमाच कौतुक होत होतं. या सिनेमात शिवाजी महराजांचा रोल करणाऱ्या चंद्रकांत मांढरे यांना प्रती शिवाजी समजून कोल्हापुरात लोक मुजरा करायचे.
भालजी पेंढारकर यांनी आपल्या साधा माणूस या आपल्या आत्मवृत्तात या सिनेमाबद्दलचा एक किस्सा लिहून ठेवला आहे
पूर्ण भारतात छत्रपती शिवाजी ची घोडदौड सुरु होती अचानक एक दिवस एका वर्तमानपत्राची ब्रेकिंग न्यूज होती. त्याची हेडलाईन होती,
“छत्रपती शिवाजी बोलपटास काश्मीरच्या अब्दुल्ला सरकारने बंदी घातली. मुंबई टाईम्सने फोडलेले गुपित.”
या लेखाचे लेखक होते प्रबोधनकार ठाकरे. या लेखात त्यांनी भारतातल्या मोठया वृत्तसंस्थानी भालजी पेंढारकरांच्या छत्रपती शिवाजी सिनेमावर काश्मीर मध्ये घालण्यात आलेली बंदी सामान्य वाचकांपर्यंत पोहचू देली नाही आणि हाच फुगा सत्य रॉय नावाच्या एका सजग वाचकाने फोडला.
सत्य रॉय हे फिल्म ट्रेडर्स ऑफ इंडिया या संस्थेचे सभासद होते. ज्या सिनेमाला राष्ट्रीय सेन्सर बोर्डने पास करूनही काश्मीर मधले अब्दुल्ला सरकार कसे काय रोखू शकते या विषयाला त्यांनी त्यांनी वाचा फोडली.३पण वाचत ३हात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सत्य रॉय यांनी जाहीर पत्र लिहिले आणि आपला सात्विक संताप व्यक्त केला.
या पत्राचा हा अनुवाद
आपण ज्यांना अगदी पाठचा भाऊ समजता, मोठा देशभक्त मानता, त्या शेख अब्दुल्ला नी त्याच्या सरकारने छत्रपती शिवाजी बोलपटावर बंदी घालून केलेल्या अवमानाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे जाहीर पत्र आपल्याला लिहित आहे.
ज्या शिवरायांनी तुम्हाला आम्हाला देशभक्तीचा नी राष्ट्रोद्धाराचा मार्ग दाखवला, विशेष करून मायदेशासाठी लढावे कसे मरावे याची स्फूर्ती सध्याचा तरुण वर्ग ज्यांच्या चरित्रावरून घेत असतो त्याच राष्ट्रपुरुषाच्या चरित्रावर आधारलेल्या  बोलपटाला अबुद्ल्ला सरकारने बंदी घातली आहे याची गंधवार्ताही आपल्याला अजून नसेल.
हा छत्रपती शिवाजी बोलपट भालजी पेंढारकर यांनी तयार केला आणि तो सरकारच्या सेन्सॉर खात्याने मुक्त प्रदर्शनासाठी मंजूर केला हे आपल्याला माहित असेलच. हा सिनेमा संपूर्ण भारतात दाखवला गेला. काश्मीर हा भारताचाच भाग आहे हा मुद्दा डोळ्यापुढे ठेवून जे आमचे हिंदी शिपाई युद्धखोरापासून काश्मिरचा बचाव करण्यासाठी ज्या भागात लढत आहेत तिथे मात्र तो दाखवला नाही.
एक मुद्दा स्पष्ट सांगतो पंडितजी, मी जातीयवादी नाही, काँग्रेसवाला नाही. एक साधासुधा भारतीय नागरिक आहे. अब्दुल्ला सरकारच्या या करणीने भारतीय जनतेपुढे नेहरू सरकारची अब्रू पणाला लागली आहे हे आपल्या नजरेस आणणे मी माझे कर्तव्य समजतो.
काश्मीर सरकारने राष्ट्रीय भावनेचा अपमान केल्यामुळे जनतेमध्ये पसरलेला संताप फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे चव्हाट्यावर आणावा असा मी विचार केला होता पण त्या संस्थेचा निगरगट्टपणा पाहिल्यावर हा जाहीर पत्राचा मार्ग मी स्वीकारला.
पंडितजी, आपण आमचे लोकशाहीचे ध्वजरक्षक! छत्रपती शिवाजी सिनेमावर बंदी घालून अब्दुल्ला सरकारने केलेला हा लोकशाहीचा अपमान तत्काळ दूर कराल आणि ज्या लोकशाहीसाठी तुम्ही आम्ही सारे खांद्याला खांदा लावून झगडत आहोत, तिच्या इभ्रतीसाठी तरी हे कर्तव्य चोख बजावाल अशी मी आशा करतो.
आपला हृदभावी,
सत्य रॉय
बोलभिडु वरून साभार
________________________
*WᕼᗩTᔕAᑭᑭ https://wa.me/917887766849  ☜♡☞
__________________________

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...