प्रेरणादायी वाक्य
जीवनात अतिशय महत्त्वाचे वाक्ये
1. शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
2. स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
3. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.
4. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
5. इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.
6. तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.
7. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.
8. काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता आणि त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
9. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर स्वत: विषयीच्या सकारात्मक बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
10. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.
Comments
Post a Comment
Did you like this blog