दुबईच्या ‘या’ 10 ‘खास’ गोष्टी... जाणून घ्या
स्वप्नांचे शहर म्हणजे दुबई... इथे खूप काही अशा खास गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपणास कदाचित माहित असणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या खास गोष्टींबद्दल…
1. भारतात पोलीस सहसा करून जीप, बोलेरो आणि स्कॉर्पिओ यासारख्या गाड्यांचा वापर करते परंतु दुबईमध्ये पोलीस लँबोर्गिनी, फरारी आणि बँटले सारख्या करोडो रुपयांच्या लग्जरी कार वापरतात.
2. विशेष म्हणजे दुबईमध्ये कोणतीही अॅड्रेस (पत्ता) सिस्टम नाही. ना कोणता पिन कोड, ना कोणता एरिया कोड आणि ना कोणती पोस्टल सिस्टम. इथे सर्व ऑनलाईन असते.
3. सहसा एटीएम मधून कागदाच्या नोटाच निघत असतात, परंतु दुबईमध्ये असे काही एटीएम आहेत ज्यातून सोन्याचे बार निघतात.
4. येथे सर्व काही उंचावर असले पाहिजे. मग ते केवळ टेनिसचे मैदान जरी असले तरी ते आकाशाला गवसणी घालेल इतक्या उंचीवर असते.
5. दुबई मॉल जगातील सर्वात मोठं शॉपिंग सेंटर आहे. इथे 1200 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.
6. एकेकाळी दुबई म्हणजे एक निर्जन ठिकाण होते, परंतु इथे आता केवळ उंच-उंच इमारती दिसतात.
*़7. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबईमध्येच आहे. म्हटले जाते की सर्वात उंच इमारतीत राहणारे लोक सूर्य जास्त वेळपर्यंत पाहू शकतात. त्यामुळे त्यांना चंद्र काहीशा उशिराने नजरेस पडत असतो.
8. जवळपास 828 मीटर उंच बुर्ज खलिफास आपण 90 किलोमीटर दूर अंतरावरून पण पाहू शकतात.
9. दुबईमध्ये फक्त इमारतींच्या आतच नव्हे तर प्रवाशांच्या सुविधेसाठी बस स्टँडवर देखील एसी (AC) लावलेला असतो.
10. दुबईमध्ये लोक कुत्रा-मांजर पाळण्याऐवजी सिंह आणि चित्ता पाळणे पसंत करतात आणि ते त्यांच्याबरोबर खूप आरामात आणि कुठलीही भीती न बाळगता राहतात.
Comments
Post a Comment
Did you like this blog