कोरोना वायरस चे भयान रूप व्यक्त करणार्‍या कविता






🌷कोरोना व्हायरस...🌷      ---------------------------


      कोरोना व्हायरस ..
      आला तरी माणूस..
      सुधारायला तयार नाही...

      मी माझ आणि माझच...
      फक्त खर... हा हेका...
      सोडायला तयार नाही....

      कोरोना व्हायरस...
      आला तरी...माणूस..
      माणूसकी ठेवाय तयार नाही 

      काल ज्याने दिवस...
      दाखविले..त्याला आज..
      लक्षात ठेवायला तयार नाही..

      याची माप काढ...
      त्याची माप काढ....
      याशिवाय त्याला उद्योग नाही.

      याला गाढीन त्याला तोडीन..
      हे म्हणल्याशिवाय ....
      याचा दिवस जात नाही...

      याला त्याला धमकविण्या..
      शिवाय याचा कोणताही...
      दुसरा उद्योग नाही..

      कोरोना आला तरी...
      माणसाची स्वार्थी प्रवृत्ती..
      अजुन काही जात नाही...

      हा हे कस करतो...
      तो ते कस करतो चौकश्या...
      शिवाय दिवस जात नाही..

      पण त्याला हे कुठ माहिती..
      दुस-यांच्या यशावर जळतो ..
      त्याची जीवनात प्रगती नाही..

      याच हे फाडीन त्याच...
      ते तोडीन म्हणणारा "लायकी
      दाखविल्याशिवाय राहत नाही

      म्हणून तर...सांगावस वाटतं..
      मित्र असो वा शत्रु..
      चार दिवस समन्वयाने वागा..

      तूमच्या माझ्यात असलेला..
      स्वतःतला मी पणा सोडून..
      एकदातरी माणूसपण शोधा..
    
      एवढंच….!

        🌷 शब्दांकन...🌷
        🌹प्रभातकवी...🌹
      श्री.यशवंत आ.गायकवाड
      विविध संस्था संघटनांचा..
      कार्यकर्ता व सेवक,सातारा...
      मो.नं.१)७९७२६९८४६४..
              २)८०८७२६१३५३






कोरोणा 



लक्षात घ्या बाबांनो
कोरोनाचं गांभिर्य 
घाबरून जाऊ नका 
दुर्लक्षही करू नका
लढू कोरोनाशी सगळे मिळून 
वाढवून अंतरी धैर्य 

कोरोनाशी लढायला
नको कोणतंही शस्त्र
प्रत्येकाने घरी थांबणं
हेच आहे मोठं अस्त्र
धुत राहू साबणाने
आपले हात आणि वस्त्र

हिमतीने सामना देतय आपलं
केंद्र सरकार, राज्य सरकार
तळमळीने ऐका सूचना त्यांच्या
वागू नका बेदरकार 

रस्ते स्टेशन मॉल सर्वत्र
दिसू द्या शुकशुकाट
तुम्ही जर बाहेर पडलात तर
तो नक्कीच शिरेल घरात

हात जोडून करतो विनंती
करा अशी जन जाग्रुती
आजचा जनता कर्फ्यू पाळा
हेच तुमच्या माझ्या देशाच्या
हिताचं आहे शेवटी 

मोदीजींनी पुकारलेल्या जनता कर्फ्युसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🌷

जय हिंद । जय महाराष्ट्र👍👍

राजेंद्र वाणी

दहिसर मुंबई
:


कोरोना
_________________________
कोरोना तुला भारतात नाही थारा
माझा देश आज एक झाला सारा
जनतेने शासनाचा आदेश मानला
सर्वांनी घरी बसून बंद पाळला



सॅनीटायझरने वेळोवेळी हात
                         धुतला
तोंडाला सर्वांनी मास्क घातला
स्वच्छतेचा वसा हाती घेतला
घरात बसण्याचा धर्म पाळला


कोरोनाने संकटात आणलं
                        जगाला
निरोगी    ठेवा   जनतेला
डॉक्टरचं आज देव झाला
कोरोनाचा पेंशट वाचवू लागला



बावीस मार्चला कर्फ्यू पाळला
कायमचा आळा बसू दे
                        कोरोनाला
आनंदाने  राहू  दे  देशाला
प्रार्थना   करतो    देवाला

-----------------------------------------
श्री. राजेंद्र बाबासाहेब टाचतोडे
पारा ता. वाशी जि. उस्मानाबाद






🌹विसरा आता कोरोनो...🌹
  -////////////////////////-

  विसरा आता कोरोनो...
  जगा जीवन आनंदाने ...
  हसत खेळत कोरोनोला..
  करा गुड बाय स्वविचाराने ...

  आज गुढी पाढवा ...
  साजरा करा आनंदाने..
  विसरा आता कोरोनो..
  आनंद एकमेकांना देण्याने..

  कोरोनो कोरोनो करत ..
  फिरू नका समूहाने..
  संयम ठेऊन जीवनात..
  घरात रहा कुटूंबाने...

  आनंद द्या आनंद घ्या...
  एक मीटर सुरक्षित अंतराने..
  एक मुखी गोड बोला …
  सत्यत्व राखा सुवचनाने....


  कोरोना कोरोना करत..
  नका राहू सदा टेंशनने..
  नका बोलू नका एकू ..
  कोरोनोला घालावा एक मुखाने..

  रहा आनंदी जगा आनंदी...
  मित्रत्वही जपा आनंदाने..
  मराठी नववर्षाचे गीत जपत..
  कोरोना विसरा सुहास्याने...

  विसरा आता कोरोनो...
  जगा सर्वजन आनंदाने..
  करा कर्म कायम सत्याचे..
  काही होणार नाही कोरोनाने..

  लक्षात ठेवा आई वडील..
  मित्र-मैत्रीणी सुहास्याने..
  भावा बहिनींच्या साथीत कोरोनो
  यमसदनी जाईल एकजुटीने...

  फक्त आणि फक्त ...
  संयम राखा रहा सदा कुटुंबाने..
  आनंदाने रहा कोरोनो जाईल..
  त्याच्या मायदेशी सुहास्याने ...

  फक्त राहुया सावध सावध...
  आणि फक्त सावधानतेने...
  राखुया अंतर ठेवूया अंतर...
  सुहास्याने आणि सुवचनाने...

     🌷शब्दांकन...🌷
     🌹प्रभातकवी...🌹
  श्री.यशवंत आ.गायकवाड
  नियोजित अध्यक्ष,
  जायन्ट्स ग्रुप ऑफ सातारा..
  सन २०२०-२१ ..
  एक समाजसेवी संघटन...
  सातारा ...
  मो.नं.१)७९७२६९८४६४..
          २)८०८७२६१३५३..





*************************

       *जबाबदारी*

सर्वांची आहे जबाबदारी 

कोरोनाशी दोन हात करु,
मंडळी आपण सारी
कोरोना जिवाहून भारी 
घ्या तुम्ही खबरदारी

येता बाहेरून फिरुन हात,

धुवां साबणाने किंवा डेटालने
कोरोना हा रोग होणार नाही 
याची दक्षता घ्या आता तरी
कोरोनाच्या भितीने रडायचं नाही
लडायचं हिंमतीने

फिरू नका बाहेर आता,

तुम्ही घरीच थांबायचं
जनता कर्फ्यूच स्वागत करायचं
मोदीजींच आपण मान राखायचं
कोरोना व्हायरस हाकलून 
लावू असा निर्धार करायचं

गोरगरीबना सहकार्य करूया

अनाथाना मदतीचा हात देवूया
पोलीस प्रसाशन डॉक्टर नर्स
यांनचं आपण आभार मानूया

✍ *दिलीप हिरामण पाटील*

         *कापडणे .ता.जि.धुळे*
*मो.नं.9673389873*

**************************




### कोरोना ###

समस्त मानवजातीला आज
जगण्याचीच फक्त चिंता आहे
कुठून आला, कसा आला 'हा'
प्रत्येकाच्याच मनी गुंता आहे...

शोध अणुबाँबचा लावणाय्रांना
बघा तो कसा हिणवतो आहे 
चुटकीत करतो विनाश तुमचा
रोजच्या रोज खुणावतो आहे...

हल्ल्यावर हल्ले अचूक करुन
या सैतानाने बघा हैराण केले
मात त्याच्यावर करण्यासाठी 
साय्रा जगाने जीवाचे रान केले

खबरदार, सावधान, धैर्य राखा
प्रधानसेवक बघा ओरडतो आहे 
रोजच प्रेतांचा ढीगारा पाहून
पंतप्रधान इटलीचा रडतो आहे

धनदौलत, जमीन, विरासत...
सारी जागीर तुमची गौण आहे
चौफेर मांडले मृत्यूनेच थैमान
कशी स्मशानशांती व मौन आहे

चंद्रावर स्वार होणाय्रा माणसा
'कोरोना' समोर तु नादान आहे
तु जग जिंकण्याची घमेंड सोड
जगाला मृत्यूचेच वरदान आहे

तुझाच रुतबा, तुझाच अहंकार
क्षणार्धातच झालाय नेस्तनाबूत 
जीव मुठीत घेऊन पळतो काय

तो ईश्वरच ठेवेल सर्वांना शाबूत




:


 *हिंमत द्या थोडी   ♀♀♀*

तळतळून सांगतोय तो,शब्दांना किंमत द्या थोडी
कोरोनाविरुद्ध लढण्याला, तुम्ही हिंमत द्या थोडी

कालपर्यंत दूर होता आता तो विषाणू आला दारात
काळजी घ्या गांभीर्याने, नाहीतर पोहोचेल घरात
आवरा आपल्या वाईट सवयी नि बंद करा खोडी
कोरोनाविरुद्ध लढण्याला, तुम्ही हिंमत द्या थोडी..!!

आजही दिवसागणिक रुग्णांचा आकडा वाढतो आहे
 इतके सगळे प्रयत्न करुनही , संकट टळेल का? हे
होय ,लगाम घाला शहरांना नि जपा आपली खेडी
कोरोनाविरुद्ध लढण्याला तुम्ही हिंमत द्या थोडी..!!

एकट्याने साखळी तुटणार ,मी पण राहील टकाटक
घर माझे, रस्ते आमचे, स्वछ आणि एकदम चकाचक
घरात घुसा ,सावध बसा,निवांत सोडवा विज्ञान कोडी
कोरोनाविरुद्ध लढण्याला तुम्ही हिंमत द्या थोडी..!!

*★★  रज्जाक शेख*🌿, 
श्रीरामपूर 9665778558




*नीरव*

कधी नव्हे ते ओसाड रस्ते
पोलिस घालती रस्त्यावर गस्ते       !! १!! 

मनुष्या शोधती रस्त्यावर कुत्रे
कुठे गेली ती  मतलबी भित्रे          !! २!! 

निर्जन झाले चौरस्ते सगळे
कालसमयी आले बहुदा वेगळे      !! ३!! 

मंदिरेही झाली बंदीस्त सगळी
कधीकाळी होती चंगळ अागळी    !! ४!! 

अशी ही *नीरव* शांतता
कधी नव्हे ती अाली भारता         !! ५!! 

©®
अविनाश

२६-०३-२०२०
गुरुवार
:



 ✈🛥🛳🚡🚖🛵🚲🛴
       *आला कोरोना*
       *आला कोरोना*
🗣🥳🗣🥳🥳🥳🗣....?
   *सहजा सहजी तो जाईना* *प्रत्येकाची भेट घेतल्या खेरीज*
   *त्याला काही करमेना*

    *विनाशाचा बादशहा अन्*
   *चक्रवर्ती सम्राट जणू*

        *सब का साथ*
       *सबका विनाश*
           *करे पर्यंत*
  *कोरोना काही थांबेना*

    *कोणताही भेदभाव*
  *कोणालाही किंमत देईना*
*समान न्याय देतो साऱ्यांना*
*कुणालाही "वंचित" ठेवीना*

🗣🥳🥳🗣🥳🥳🥳🥳
        *आला कोरोना*
        *आला कोरोना*
*सारेच जाग्यावर थांबलेना*
*जग सारे भांबावलेना*😟
*आवळले साऱ्यांचे मुसके*
*देतो साऱ्यांनाच हिसके*😷
*तरी कुणी काही बोंबलेना*
*तोंड दाबून बुक्क्यांचा*                             
  *मार आता सहन होईना*

🗣🥳 *आला कोरोना*
           *आला कोरोना*
 *कुणालाच काही समजेना*
*माणूस जन्माला ऐकटाच येतो*
*जावेही लागते ऐकट्यालाच*

🙏 *सोडा आता सारा भ्रम*
      *उगीच नका राहू गरम*
     *धन नको, संपत्ती नको*
   *उगीच कोणती आपत्ती नको*

   *रहा गुण्या गोविंद्याने*
        *करू नका गर्व*
    *येथेच अनुभवा स्वर्ग*
   *करू नका त्याचा नर्क*

*सांभाळ करा मुलां बाळांचा*
*बायकोचा तसा मायबापाचा*
*नका राहू कामात ऐव्हढे गर्क*
*मी आलो तसा जाईलही बापहो*,,,,,,,,,

*काढू नका काही तर्क वितर्क*
*कामी कोणताही येणार नाही अर्क* 
*बंद करा  सारे व्यवहार तुर्त*
*तरच पूर्ण होईल तुमची मनोकामना*
🙏 *रहा फक्त सतर्क*🙏

  *समाजातून घेतले सारे*
*निसर्गातूनही ओरबडले*😳
*अरे,माणसां माणूस ना तू*❓
*तरी डोळे तुझे का नाही डबडबले*😨

      *आला कोरोना*
      *आला कोरोना*
*फक्त तू बोंबलतच सुटला ना*
     " *अनुभव हीच खात्री*"
*आता तरी काही शिक ना*
   
 *होशिल तू कधी शहाणा*?
*प्रत्येकाशीच का करतोस*
*लढण्यासाठी* 🏹 *सामना*

*नाही मी नुसताच कोरोना*
*वाट कुणाची काही पहावे ना*
*शिकवून जाईल मी प्रत्येकाला*
*माणूसकीचा नवा कोरा धडा*

*हिशोब चुकता मी*
*साऱ्यांचाच करेल ना*

     *आला कोरोना*
      *आला कोरोना*
*कुणालाच काही समजेना*

🙏 *करू नका भेदभाव कोणताही*🙏
*लावा सर्व प्राणीमात्राला लळा*
*फुलवा माणूसकीचा मळा*
       *आला कोरोना*
        *आला कोरोना*
*कुणालाच काही समजेना*

😡 *नुसताच नाही मी कोरोना*
*जगावर राज्य करणाऱ्या*
    *अहंकारी माणसा*
 *आता तरी नमन कर तू*
*माणूसकीचा धडा शिकविणाऱ्या*
*या नव्या अध्यात्मिक गुरूंना*
        *आला कोरोना*
        *आला कोरोना*
🙏🙏🙏🙏🥳🙏🙏🙏
*सुरेश इंगळे* जिल्हाध्यक्ष 
*शिक्षक साहित्य संघ, अकोला*






〰️〰️〰️〰️〰️〰️
*।। कोरोना बुलाता है।।*
〰️〰️〰️〰️〰️〰️
हात हमेशा धोतें रहना,
स्वास्थ्य के लिए है सही ।
दूर रहना सीखो यारो,
हात भी मिलाना नहीं ।।

सँनीटायज़र और मास्क,
आपके रक्षक है यही ।
कमाल अंतर रख लो,
भीड़ में कभी जाना नहीं ।।

छींकते समय रुमाल,
सदा के लिए रखना सही ।
हस्पताल में तुरंत जाओ,
चेकअप करे डरना नहीं ।।

कोरोना का संसर्ग हमें,
मिटाकर रहना है यही ।
घर बैठे लड़ाई करलो,
कोरोना सें हारना नहीं ।।

मौत का नाम है वह,
न जाना बाहर कही ।
कोरोना तो बुलाता है,
मगर आप जाना नहीं ।।
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
©® कवी संजय कान्हव (कान्हा)

नाशिक, 9850907498

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...