या सवयी अंमलात आणा आणि 10 वर्षांनी आयुष्य वाढवा
वाढत्या वयात नियमीतपणे व्यायाम करा. तसेच योग्य आहार घ्या. त्यामुळे महिलांचे वय 10.6 वर्षे तर पुरुषांचे वय 7.6 वर्षे पर्यंत वाढू शकते.
धूम्रपान केल्याने थेट आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर परिणाम होतो आणि मृत्यूचा धोका वाढतो, त्यामुळे धूम्रपान करणे टाळा.
फास्ट फूड खाणे टाळा आणि संतुलित आहार घ्या. रोजच्या आहारात ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या आदींचे सेवन करा
वाढत्या वयात नेहमीच तंदुरुस्त आणि निरोगी राहाण्यासाठी दररोज कमीतकमी 30 मिनिटे शारीरिक क्रिया करा.
धावणे, सायकल चालविणे, पोहणे, अशा व्यायामाची सवय लावा.
निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि यासाठी आपले 'बॉडी मास इंडेक्स' नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
आपला 'बीएमआय' 18.5 आणि 24.9 दरम्यानचा असावा आणि त्यापेक्षा अधिक नसावा.
Comments
Post a Comment
Did you like this blog