15 दिवसांत अभ्यास करून मिळवा 90 टक्के मार्क



महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे.

1. दिवसात एका विषयाचे दोन धडे पूर्ण करण्याचा निर्धार करा. प्रत्येक शब्द समजून आणि शांतपणे वाचायला हवा. तीन तासांत एका विषयाचे दोन धडे वाचून पूर्ण व्हायला हवेत.

2. त्यानंतर दोन तास फक्त धड्याखालचे आणि इतर प्रश्न सोडवण्यावर भर द्या. उत्तरं लिहिताना ती मुद्द्यांमध्ये लिहिल्यानं लक्षात राहातील आणि लेखनाचा सराव होईल.

3. विज्ञान, गणित सारख्या विषयांमध्ये सराव महत्त्वाचा आहे. सूत्र लिहून पाहा. विषय ठरवून घ्या. भाषा, सोशल सायन्स, सायन्स आणि गणित या चार पैकी अलटून-पलटून विषय घ्या.

4. एवढं करून तुमच्याकडे वेळ उरला दिवसभरात तर तुम्ही घड्याळ लावून सराव पत्रिका किंवा मागिल वर्षीची प्रश्न पत्रिका सोडवायला हवी.आत्मविश्वास ठेवा. योग्य विश्रांती घ्या. आणि सोप्या शब्दात पण आपल्या भाषेत उत्तर पत्रिकेत लिहा.

5. योग्य तिथे आकृती, ट्री डायग्राम किंवा चार्ट काढावा. यामुळे तुम्हाला उत्तर लिहिताना फायदा होईल. आकृत्यांना पेन्सिलिनं चौकोन करावा. आकृत्यांमध्ये खाडाखोड नसावी.

6. पेपरमध्ये खाडाखोड झाली तर चार वेळा एकाच ठिकाणी न खोडता एक काट मारून पुढे जावं. एकच शब्द दोन ते तीन वेळा गिरवणं टाळावं.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !