◼️कविता :- गुरूजी जीवन आरसा... | Arjun Apparao Jadhav
गुरूजी जीवन आरसा...
___________________________________
वर्ष संपले जरी संपले जीवन...
सर तुमचे शब्द असतील शेवटपर्यंत मनोमन ...
दुष्काळ जरी पडले जीवन आठवणी कायम हिरव्या असतील...
आणि
त्या दुष्काळावर मात करण्यासाठी सर तुमचे मार्गदर्शन सदैव आमच्या पाठी राहतील...
सर तुम्हीच शिकवले जगायला आम्हाला ...
आयुष्यातील काट्यांना फुलाप्रमाणे बघायला...
तुम्हीच सांगितले आहे
काटे नाही अडवू शकणार वाटेवरुन जाताना...
इच्छा जर तीव्र असेल तर काटे दिसतील फुल होताना...
सर खरच भाग्यवान आहोत आम्ही...
आम्हाला गुरु लाभलात तुम्ही...
जसे की एकच सूर्य प्रकाश देई अनंत नभी...
Sssss
सर तुम्हीच म्हणता सूर्य उगवला नाही तर अंधार कसा जाईल ...
माणसाने जर प्रयत्न केला नाही ही तर तो मोठा कसा होईल...
माझ्या मते !
सर माणसाने आयुष्यात जुगनू प्रमाणे जगावे...
आयुष्यातील अंधाराला स्वयंप्रकाशाने बघावे...
- अर्जुन अप्पाराव जाधव
मु.नंदनशिवनी ता.कंधार जि.नांदेड
संपर्क :- jadhavarjun401@gmail.com
________________________________
Comments
Post a Comment
Did you like this blog