स्वतःचे परिक्षण - बोधकथा

एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्यचकित होत होता.

"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा.  "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.

*पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????*

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

*"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"*

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

*तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचे ठरवाल.अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...