जिवन एक सुख दुःखाचा भोगावया लागणारा खेळ आहे, सुख दु:खात फरक येवढा आहे व्यक्त केल्यास दुःख आहे व व्यक्त करणा गेल्यास सुख आहे. . .
आनंदात राहा सुखाने रहा
नमस्कार मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर ( डॉ, राजेंद्र भारुड )_ ___ माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. अभिनेता अमीर खान आणि मी मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली का...
नवरा माझा पहिले होता कुंकवाचा धनी, आता मात्र, तो आहे फक्त...... माझ्यासाठी ब्लॅक अँण्ड व्हाइट मनी, पहिले होता तो, माझ्या घराचा पहारेकरी, आता मात्र, आहे नुसताच तो... माझ्या प्रेमाचा वाटेकरी, त्याच्यामुळे बसली आमच्या विस्कटलेल्या संसाराची घडी, आता मात्र, नुसताच आहे तो... माझ्यासाठी एक 'घरगडी', पहिले होता तो माझ्यासाठी, संकटी धावुन येणारा 'देव', आता मात्र, वाटतो मला तो... नको-नकोशी वाटणारी 'ठेव', म्हणायचे पहिले मी, त्याला आदराने 'पंत', आता मात्र, तो झाला... माझ्या सहनशिलतेचा अंत, पहिले होता, नवरा माझा भोळा, आता मात्र, वाटतो तो मला... संसारी माझ्या, आकार-उकार नसलेला फक्त एक... मातीचा 'गोळा', मंगेश शिवलाल बरंई. पंचवटी, नाशिक ४२२००३.
कृषी ग्रुप 1 : https://chat.whatsapp.com/Cjk5s983tMDCN8Lg4B9D2k कृषी ग्रुप 2 : https://chat.whatsapp.com/LOpsQHSSFCA3dpMezAYVBp किसान सन्मान निधी किसान सन्मान निधी कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे. १ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
कोरोना संसर्गातून बचावासाठी , अंगिकारले होते मंत्र । मीच माझा रक्षक होईन , हेच सरकारने दिले तंत्र ॥ हाच महत्त्वाचा संदेश , महाराष्ट्रात सर्वानी पाळावा । स्वयं शिस्तीने एकमेकांपासून , अंतर सर्वानी ठेवावा ॥ संपूर्ण जगात घातला आहे , असा धुमाकूळ कोरोनाने । त्याला लगाम लावण्यासाठी , रक्षक बनावे या मंत्राने ॥ जीवनात आले कितीही संकट , आपल्यालाच बनावे लागते रक्षक । आयुष्य जगण्याला मदत होते , नाहीतर इथे अनेक आहेत भक्षक ।। करुया आपण जनजागृती , "मीच माझा रक्षक" होईन । स्वस्थ राहा , स्वस्थ राहू दया , या मंत्राचा वारसा घेईन ॥ ======================== महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन " गोंदिया =======================
------------------------------------------------------- 🔴 थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विचार बनाये जिंदगी! ------------------------------------------------------- त्या घटनेला आज एकतीस वर्ष झाले. तीन दशकांपासुन बॉलीवुडमध्ये आपलं स्टारपद अढळपणे मिरवणारा आमिर खान तेव्हा आपल्या वयाच्या विशीत होता, त्याचा चुलत काका मन्सुर खान ह्यांनी त्याला हिरो म्हणुन हिंदी सिनेमामध्ये लॉन्च करायचे ठरवले होते, फिल्मचे नाव होते, कयामत से कयामत तक, आणि ती एक लो बजेट फिल्म होती, चित्रपट पुर्ण झाला, पण सिनेमा बनवातानाच संपुर्ण बजेट संपले होते, सिनेमाची प्रसिद्धी आणि प्रमोशन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्याकडे पुरेसे पैसेच उरले नाहीत. त्याकाळात तर केबल नेटवर्कही नव्हते, इंटरनेटही नव्हते, त्यामुळे चित्रपटांची प्रसिद्धी मुख्यतः पोस्टरमधुनच व्हायची. अमिर खान नवखा असला, कुमारवयीन असला, आणि पहील्याच सिनेमाचा हिरो असला तरी, लहानपणापासुन ह्या क्षेत्रात वावरल्याने त्याला सिनेमाच्या तंत्राची चांगली जाणीव होती. कसलाही खर्च न करता, आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी...
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली : चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता. किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्यांना तो भीकही देऊ शकला असता. पण नाही. ते त्याला जमलं नाही. याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती. आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून ...
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो. इंद्र त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो. त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते...
एक सत्य घटना विक्रम साराभाई यांच्यासोबत घडलेली स काळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती. एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते. तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती. तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता. त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ. त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे.. पुढे मोठ्या तुसडेपणाने - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाच...
'Wings Of Fire' मराठी अनुवाद :- 'अग्निपंख' भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम व समूह निर्मित तत्कालीन शक्तिशाली क्षेपणास्त्र, ज्याचं नाव, 'अग्नी !' परकीय राष्ट्रांच्या विरोधाची क्षिती न बाळगता, सलग दोन वेळा अपयश येऊनही, प्रसारमाध्यमे, राजकीय नेतेमंडळी व संपूर्ण भारतभर होणाऱ्या टीकेच्या दबावाखाली ५०० शास्त्रज्ञांच्या धैर्यशील प्रयत्नांमुळे २२ मे १९८९ रोजी 'अग्नी' अवकाशात झेपावले ! शीर्षकाची उकल करून सांगायचं झाल्यास, 'अग्निपंख' म्हणजे 'अग्नी चे उड्डाण !' डॉ. कलाम यांचं व्यक्तिगत आयुष्य, व्यवसायिक संघर्ष, जागतिक शस्त्रस्पर्धा, तत्कालीन राजकारण व तंत्रज्ञान यांचं वर्णन केलेलं, आपल्यातील आत्मशक्तीची जाणीव करून देणारं हे स्फूर्तिदायी खंडकाव्य तथा आत्मचरित्र ! लहानपणी ज्यांना शास्त्रज्ञ व भारताचे राष्ट्रपती म्हणून मी पाहिलं ते डॉ. कलाम एक माणूस म्हणून कसे होते हे मी 'अग्निपंख' मधून पाहिलं. स्वयंशिस्त, चिकाटी, समयनियोजन, कार्यव्यवस्थापन, निश्चयशक्ती, धार्मिक वृत्ती व...
आज स्त्रियांचा जन्मच मुळात नाकारतला जातो. पण स्त्रीयांमुळेच कुटुंबाचा वंशाचा वारसा पुढे-पुढे चालत राहतो हे समाज सोयिस्करपणे आज विसरला आहे. एक स्त्रीच पुर्ण कुटुंबाला शिक्षित करु शकते. आई बनुन, एका वटवुक्षाच्या सावलीप्रमाणे कुटुंबाचा मानसिक आधार बनुन. ऐतिहासिक काळापासून आईचं महत्त्व सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राचे लढवय्या राज्यकते शुरवीर शिवाजी महाराजांची आई जिजाऊबाई ह्या शिस्तप्रिय आई म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ह्या शिस्तप्रियतेचा फार मोठा वाटा शिवाजी महाराजांच्या यशात आहे. तसेच साने गुरजींच्या कथेतील शामची आई तिच्याविषयी कितीही लिहिले तरी शब्द अपुरेच पडतील. ती तर साक्षात वात्सल्याची मुर्तीच होती. असे इतिहासातील कितीतरी दाखले आपल्याला देता येतील. स्त्री ही विविध भावनांनी नटलेली आहे. दैवानं मातुत्वाचं दान तिच्या पदरात टाकून तिचं श्रेष्ठत्व सिद्ध केल़ं आहे. तिच्या मनात वात्सल्याची भावना निर्माण केली.स्त्रीच्या या विविध भावनांच्या शुंगारानं स्त्रीचं सौदर्य आधिकच खुलून दिसतं. आई या शब्दात मुळातच आप आणि ईश्वर...
Comments
Post a Comment
Did you like this blog