देतो तो देव - बोधकथा

 *देतो तो देव*


 ही गोष्ट आहे विनोबा भावे यांची. विनोबाजी ना आई विनू म्हणायची, विष्णूच्या घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. झाडावरचा पिकलेला फणस काढून आईने कापला. त्यातील रसाळ गरे काढले. वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले. विनू पाहतच होता. रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोन आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. पण आईने त्यातले दोन द्रोन विनू च्या हातात दिले व शेजार्‍यांकडे पोहोचविण्यास सांगितले. विनूने दोन्ही घरी द्रोन नेऊन दिले. पण तो नाराज होऊन म्हणाला, " आपल्याच घरचे फळ नीआपल्याला मात्र सगळ्यात शेवटी." आई हसली आणि म्हणाली, " अरे आपल्या जवळ जे असतना त्या अगोदर इतरांना द्यावे आणि मग आपण घ्यावं. इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर नाही. लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. देणे हा देवाचा उत्तम गुण आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे. आता तूच ठरव तुला देव व्हायचं आहे, की राक्षस? " विनू ची समजूत पटली. त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली. तात्पर्यः स्वतःसाठी तर सर्वजण जगतात परंतु इतरांसाठी ही जगून पहाव

Comments

Popular posts from this blog

कविता :- आतुरता

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

जिवन विचार - 52