सकाळी थंड पाण्याने आंघोळ केल्याचे फायदे

गार ,थंड पाण्याने सकाळी अंघोळ केल्याने आपले शरीरातील रक्ताभिसरण चांगले होतेच पण त्या व्यक्तीच्या चेहर्यावर्ती वेगळेच तेज पाहायला मिळते,एक वेगळाच प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो.गार पाण्याने अंघोळ करण्याने आपले हाडांना बळकटी मिळते,हाडे मजबूत होतात, 
गार पाण्याने अंघोळ करणारी व्यक्ती सहसा कोणत्याही आजाराला बळी पडत नाही कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती हि गरम पाण्याने अंघोळ करणार्यांनपेक्षा नक्कीच जास्त असते, 
तुम्ही कधी बारीक निरीक्षण केलं आहे का? 
गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर थंडी वाजते,पण थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर अंगात ऊर्जा वाढते म्हणण्यापेक्षा शरीरच आपल्याला तसे प्रतिक्रिया देते. 

        थंड पाण्याने अंघोळ करणार्याची अनेक उदाहरण आहेत,पण माझ्या सभोवतलीची तसेच माझ्या सरांनी सांगितलेली उदाहरणे सांगतो म्हणजे पटतील,सरांच्या ओळखीचे दोन शिक्षक म्हणजे एक शिक्षक आणि एक शिक्षिका आहेत,त्या सद्याच्या स्थितीला शंभरी(शताब्धी)झाली आहे ,त्यातील सर हे मासांहारी आहेत तर मॅडम ह्या शुद्ध शाकाहारी आहेत तरीपण दोघे शंभरी कसे जगले? 
तर मित्रानो त्या दोघांमध्ये एक गोष्ट साम्य होत ते म्हणजे ते दोघे दररोज सकाळी लवकर थंड पाण्याने अंघोळ करायचे. 

तसेच मी बाहेर शिक्षणाला असताना भाडेच्या खोलीवर असताना,आम्हाला गरम पाण्याची सोय नव्हती, पण थंड पाणी मुबलक होते,खोलीचे मालक वयाने जास्त झाले असले तरी अजून पण थंड पाण्याने अंघोळ करतात आणि त्यांना आम्ही दादा म्हणायचो,पण दादांना मी तिथे दोन वर्ष होतो पण एखादही दादांना आजारी पडलेलं पाहिलं नाही,आणि न चुकता बरोबर पाच वाजता उठताना पाहिलं आहे,आणि मला पण तेव्हा पासून गार पाण्याने अंघोळ करण्याची सवय लागली तसेच हॉस्टेल असताना तर गार पाण्याशिवाय तर पर्यायच नव्हता. 
पण गार पाण्याने अंघोळ केल्याने अंगात जो जोश यायचा ना तो अफलातून असायचा ,कधीच आळस अंगात शिरायचा नाही,आणि डॉक्टर आणि माझी वर्षभर तरी गाठ पडायची नाही. 

एकदा प्रयोग करून पहा फरक जाणवेल 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...