योग्य शिक्षा - बोधकथा

झाडावर 🌳 बसलेल्या एका  कबुतराला एक शिकारी 👳 हातातल्या बंदुकीने 🔫 गोळी मारणार ,  इतक्यात एका सापाने  🐍त्या शिकार्याच्या पायाला चावा घेतला.

       साहजिकच सापाचे 🐍विष अंगात चढू लागल्यामुळे  त्याच्या हातातली 🔫बंदूक पडली व तोही कोसळला व मृत्यूपंथाला लागला.
  
   मरतांना तो स्वतःच्या मनात म्हणाला,  *"निरपराध अशा प्राण्याचा जीव घ्यायला गेलो , त्याची ही योग्य शिक्षा मला देवाने  दिली ."*

*तात्पर्यः जो नाहक दुसऱ्याचा जीव घेतो,  तो एके दिवशी स्वतःचे प्राण गमावून बसतो.*


Comments