योग्य शिक्षा - बोधकथा

*पिंपळावर बसलेल्या एका कबुतराला एक शिकारी हाततल्या बंदुकीने गोळी मारणार, इतक्यात एका सापाने त्या शिकार्याच्या पायाला कडकडून चावा घेतला.*

*साहजीकच सापाचे विष अंगात चढू लागल्यामुळे त्या शिकार्याच्या हातातली बंदूक जमिनीवर पडून , स्वतः तोही खाली कोसळला व मृत्यूपंथाला लागला.*

*मरता मरता तो स्वतःशी म्हणाला , " निरपराध अशा प्राण्याचा जीव घ्यायला गेलो , त्याची ही योग्य शिक्षा मला मिळाली."*

*तात्पर्यः  जो नाहक दुसऱ्याचा जीव घेतो, तो एके दिवशी स्वतःचे प्राण गमावून बसतो.*

Comments