देव आहे का नाही ?

देव काय आहे? 

क्षणाक्षणाला जिवंत ठेवणारा प्राणवायू देव आहे. 
जन्म देणारे आई वडील देव आहेत, जेवायला देणारा देव आहे, निसर्ग देव आहे. 
शेतकरी, सैनिक, डॉक्टर, शिक्षक देव आहेत. 

चांगलं पाहणाऱ्याला डुकरा-कुत्र्यात पण देव दिसेल, कणाकणात देव दिसेल, दगडात पण दिसेल. 
पण दगडबुद्धी व्यक्तीला फक्त दगडातंच देव दिसेल. 
तो त्या दगडाच्या मागे पाप करेल आणि समोर ढोंग करेल. 

कठीण समयी दगड पण आधार देतो, जो आधार देतो तो देव आहे. 

देव सर्वत्र आहे. चांगले काम करत रहा, देव पाहत आहे


मानवानेच देवाची निर्मिती केली त्याचे पुरावे. 

१) माणुस सोडुन जगातील एकही प्राणी देव मानत नाही. 
२) जिथ माणुस नाही पोहचला तेथे मंदिर मस्जिद किंवा चर्च नाही सापडले. 
३) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत याचाच अर्थ 
मानवाला जसी कल्पना सुचली तसा देव तयार झाला. 
४) जगात अनेक धर्म व पंथ व स्थानीक देवता आहेत याचाच अर्थ देव सुद्धा एक नाही. 
५) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत 
६) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत. 
७) मानला तर देव नाही तर दगड ही म्हण उगीचच नाही तयार झाली. 
८)तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे संत वचन 
९)जगातील देवतांचे  
वेग वेगळे आकार व त्यांना प्रसन्न करण्याच्या वेगवेगळ्या 
पुजा  
१०) आता पर्यंत ठाम पणे मला देव भेटला असे कुणी सांगु शकला नाही 
११) देव माननारा व न माननारा ही सारखेच आयुष्य  जगतो 
१२) देव कुणाचेच काहीही भले वा वाकडे करू शकत नाही 
१३) देव कोणताही भ्रष्टाचार अन्याय चोरी बलात्कार आतंकवाद अराजकता रोखू शकत नाही.
१४) लहान निष्पाप बालकावर गोळ्या घालनाराचेही हात धरू शकत नाही. 
१५) मंदिर मठ आश्रम प्रार्थना स्थळे व देवांचे वास्तव्य ज्या ठिकाणी मानले जाते त्या ठिकाणी सुद्धा बालके स्त्री सुरक्षीत नाही. 
१६)मंदीर मस्जिद व चर्च पाडताना देव एकदाही आडवा आला नाही की बांधताना नगर पालीकेची परवानगी घेतली नाही 
१७) अभ्यास नकरता  
एकाही देवाने विद्यार्थ्याला पास केल्याचे आठवत नाही. 
१८) केदारनाथ मध्ये एकाच वेळी १०००० लोक मेली एकालाही त्याने वाचवले नाही 
१८) ब-याच देवांचा २५ वर्षापुर्वी मागमुसही नव्हता ते प्रख्यात देव झाले आहेत 
१९) स्वतःस भगवान म्हणून घेणारे सध्या जे़लची हवा घेत आहेत 
का त्यांना भगवान बाहेर काढत नाहीत 
२०) जगात २५० कोटी लोक देवच मानत नाहीत तरी ते समाधानाने व आनंदाने रहात आहेत. 
२१) हिंदु अल्लाला मानत नाही मुस्लीम देवाला मानत नाही  
ईसाई देव व अल्लाला मानत नाही हिंदू मुस्लिम 
गॉड मानत नाही  
तरीही कोणत्याही देवाने एकमेकांला विचारले नाही की असं का? 
२२) एक धर्म म्हणतो त्याला आकार नाही दुसरा देवाला आकारदेवुन फॅन्सी कपडे घालतो 
तिसरा वेगळच सांगतो 
म्हणजे नेमके काय  
२३) देव आहे तर लोक धाक का पाळत नाहीत 
२४) समाजाला घातक गोष्टी का करतात. 
२५) जो मांसाहार करतो तोही जगतो नाही करत तोही जगतो  
दोन्ही खातो तोही जगतो 
२६) अमेरिका देव मानत नाही तरिही महासत्ता आहे. 
२७) आपल्या कडे ३३कोटी देव आधिक महाराज आधिक अल्लाहआधिक गॉड अाधीक संत महंत ऊत आला आहे तरी पाऊस नाही.गरीबी पासुन मुक्ती नाही शेतक-यांच्या आत्महत्या कमी नाहीत बलात्कार कमी नाही रोगराई कमी नाही 
भ्रष्टाचार कमी नाही. 
या सर्व बाबी वरून लक्षात  येते की मानसाला देवाचा धाक नाही उलट देवच घाबरलेले आहेत 
कारण देवाचा निर्माता मानवच 
आचारसंहिता पाळत नाही.बिच्चारे देव काय करणार. 

उत्तर पटले तर बघा नाहीतर सोडून



ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी नक्की वाचा 

    जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले  रहस्य आणि भक्तांची श्रद्धा:- 

     जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांचे शरीर शोधून त्याचा दाहसंस्कार केला. इतर सर्व शरीर जळून गेले पण हृदय जळतच राहिले. नंतर तो पिंड नदीच्या पाण्यात सोडण्यात आला. त्या पिंडाचा त्या जळत्या हृदयामुळे एक लगदा तयार झाला. राजा इंद्रद्युम्न याला तो लगदा मिळाला, त्याने तो लगदा भगवान जगन्नाथाची मूर्ती तयार करून त्यात ठेवला आणि मंदिरात स्थापन केला. 

दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते, परंतु मूर्तीच्या आतील तो लगदा आजपर्यंत कोणीही पहिला नाही. जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हात सुद्धा कापडाने गुंडाळले जातात. त्यामुळे आजपर्यंत कोणीही त्या लगद्याला पाहू शकला नाही किंवा त्याचा स्पर्श अनुभवू शकला नाही! 

असे म्हटले जाते कि भगवंताच्या हृदयाच्या लगद्याला जो कोणी पहिल त्याचा  तात्काळ  मृत्यू होईल कारण त्या हृदयात ब्रह्मदेव आहे आणि प्रचंड तेज आहे जे कोणीही सहन करू शकणार नाही. 

    ज्या दिवशी जगन्नाथाची मूर्ती बदलली जाणार असते त्यादिवशी सरकारकडून संपूर्ण पुरी शहरात वीज बंद करून अंधार केला जातो. 'मूर्तीत श्रीकृष्णाच्या हृदयाचा लगदा आहे का?' हि बाब एक रहस्यच आहे! 

१> भगवान जगन्नाथाच्या मंदिरावरील ध्वज नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो, म्हणजे हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर झेंडा पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकतो, असे का होते, हे शास्त्रज्ञ पण सांगू शकले नाहीत! 

२> मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी असलेले सुदर्शन चक्र पुरीमध्ये कुठेही उभा राहून पाहता येते आणि कुठूनही पहिले तरी असेच वाटणार कि हे सुदर्शन चक्र आपल्या समोरच आहे! 

३> सर्वत्र पहिले तर असे आढळून येते की, दिवसा वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात पण पुरी याला अपवाद आहे, इथे नेमकं याच्या उलटे होते दिवसा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात! 

४> भारतातल्या बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखरांवर पक्षी बसलेले दिसून येतात परंतु जगन्नाथाच्या मंदिराच्या आजवरच्या इतिहासात एकही पक्षी मंदिर शिखर परिसरात फिरकला नाही! 

५> मंदिराच्या सिंहद्वारातून आत प्रवेश करताच समुद्राचा आवाज येणे पूर्णपणे बंद होतो. मात्र संपूर्ण पुरीमध्ये अन्य कुठेही जावा, समुद्राचा आवाज येतच असतो! 

६> अन्य बहुतांश मंदिरात श्रीकृष्ण आपल्या पत्नीसमवेत विराजमान असतात पण या मंदिरात मात्र ते आपले भाऊ बळराम आणि बहीण सुभद्रे सहित विराजमान आहेत! 

७> मंदिराच्या शिखराची उंची २१४ फूट आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसाच्या कोणत्याही क्षणी त्याची सावलीच कुठे  पडत नाही! 

आज पर्यंत ह्या रहस्यांची  उत्तरे कोणतेही शास्त्र वा शास्त्रज्ञ देऊ शकलेले नाहीत . 





ज्यांचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा...🔆* 

भारतातील प्रख्यात *हार्ट - स्पेशालिस्ट डाॅ. मांडके* आज खूप आनंदात होते.

त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.

त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते *विमानाने*  दिल्लीला जायला निघाले होते.

ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले.

*डाॅ. मांडके* विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात....



इतक्यात ....


अचानक ...विमानाचे *आपातकालीन लँडींग* करण्यात आले.


*डाॅ. मांडके* समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले...

विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे.

त्यामुळे डाॅक्टरांनी *एक कार*  भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.

त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता.

पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले....


प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप *जोराचा पाऊस* सुरु झाला..

रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते.
बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते *रस्ता चुकले* आहेत...


पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने *आसरा* शोधून थांबावेच लागणार होते...


सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे *कौलारु घर* दिसले.

कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा *दरवाजा ठोठावला.*


एका *तरुण स्त्रीने* दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले.

तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.

त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी *चहा आणि काही बिस्किट आणले.*

जरा वेळाने ती म्हणाली ..

माझी *प्रार्थनेची वेळ* झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का?


डाॅक्टरांचा फक्त *कर्मयोगावर* विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या *मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली*...

प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा *पाळणा* हलवत होती.

डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!


काही वेळाने तिची *प्रार्थना संपली.* ...

डाॅ. नी तिला विचारले ...

या सगळ्यांचा तुम्हाला *काही उपयोग झाला का कधी?*

देवाने कधी तुमची *हाक ऎकली आहे का?*

आणि तुम्ही तो *छोटासा पाळणा का हलवत होतात?*

....


त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली...

खोल आवाजात ती म्हणाली ...

*माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे*..
मुंबईतील प्रख्यात *डाॅ. मांडके* सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ *पुरेसे पैसे नाहीत..*

*मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल*..."



...



*पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली*...


*डाॅ. मांडके*अगदी स्तब्ध झाले ...
काय बोलावे ते कळेनाच त्यांना ...

*त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला*.

कोणतेच लक्षण नसताना *हवामान खराब* होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही....

गाडीने जाताना पावसाने *रस्ता चुकला ...*

याच घरात *आसरा घ्यावा लागला* ...

आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली *वस्तुस्थिती*....


...

काय अद्भूत् .. *चमत्कारच* जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची *ओळख सांगितली* आणि वातावरण ठीक झाल्यावर *तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...!*


...


*सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ....*


*देवावरची अपार निष्ठा !*

...


*कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!*

*या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण *देव आहे एवढे मात्र नक्की*......!!!! 





खरे देव 

देव आहे की नाही...? देव कुठे असतो आणि कसा असतो या पेक्षा देवाचे खरे महात्म्य समजून घ्या ...जे आपले दुःख इच्छा विसरून आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जी धडपड करतात ते आई वडील देव असतात ...दिवस रात्र स्वताचे घाम गाळून पोटाला मार देऊन आपले पोट भरण्यास ज्याचा हातभार असतो त्या अन्नदाता बळीराजांत देव असतो ...जो व्यक्ती स्त्री जातीचा मान सन्मान राखतो त्यात देव असतो ...ज्या दगडात देव म्हणून संबोधले जाते आणि त्याचे मंदिर बांधून त्यात पावित्र्य राखले जाते की तिथे जाऊन मनाला एक शीतलता शांति समाधान मिळते ते वास्तव्य देव असते ...जी झाडं ,फळं ,फुलं ,पानं , पशु प्राणी अशी नैसर्गिक जीवंत उदाहरणं आहेत ज्यांमुळे ही सृष्टि निर्माण झाली आणि आजतगायत आहे त्यात देव वसले आहे ...तुमच्या मनातील चांगुलपणात देव आहे जो तुम्हाला सन्मान मिळवून देतो...निसर्गात देव आहे जो आपल्याला जीवन प्रदान करतो ...देवाचे विभिन्न प्रकार आहेत ...तुम्ही नास्तिक आहात असं नाही म्हणनार मी पण तुम्ही देवांवर विश्वास ठेवत नाही कारण देवाच्या नावाने अनेक गोष्टी चुकीच्या केल्या जातात किंवा कोणाचा बळी घेतला जातो ...कोणावर विनाकारण जबरीने प्रथा लादल्या जातात ...पण म्हणून देव वाईट नाही तर ती परिस्थिति वाईट आहे आणि त्या परिस्थितिला असलेले व्यक्ती कारणीभूत असतात ...मानवधर्म हाच खरा धर्म होय ...माणुसकी हीच खरी जात होय ...आणि प्रेम माया दया संयम हुशारी व्यक्तिमत्त्व हाच खरा ईश्वर होय ...देव आहे तो आपल्या सुंदर नजरेत आहे ....
काही चुकले असल्यास क्षमस्व..!
धन्यवाद!!





देव - 

देवाचा जन्म कसा झाला

देवानी माणसाला जन्माला घातला कि माणसानं देवाला जन्माला
घातलं. फार पूर्वी जेव्हा माणूस इतर प्राण्यांसारखा जंगलात राहत होता तेव्हा त्याला भूकंप,
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट ह्याची अनामिक भीती वाटायची. ह्या गोष्टी कशामुळे होतात जे
त्याला माहित नव्हतं. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्यांना उत्तरं नव्हती. मग त्याने त्या
नैसर्गिक शक्तींना देव बनवलं. सुर्य, वारा , पाऊस ह्यांना प्रसन्न करण्यासाठी तो त्यांची प्रार्थना करू लागला 
नंतर जेव्हा तो शेती करू लागला तेव्हा तो जमिनीलाच आपली आई समजू लागला. चांगला पिक हे
सुपीक जमीन, पाऊस आणि सूर्यावर अवलंबून आहे हे कळल्यावर तो त्याची पूजा करू लागला.
सध्या आपण ज्याला देव - धर्म म्हणतो ह्या पाच दहा हजार वर्षात निर्माण झालेल्या घटना आहेत.
देवाची कल्पना माणसानं निर्माण केली आहे. आणि माणसानं निर्माण केलेल्या देवाला कसं मान्य करणार.
माणसांनी त्याच्या कल्पना शक्ती आणि प्रतिभेतून देवाला जन्माला घातले. सगळ्या देवांची, देव कल्पनांची
उपज माणसाच्या मेंदूतून झालेली आहे. आणि त्यांचे व्यवहार कसे असावेत, नसावेत यांची आखणीही
माणसानंच केलेली आहे. या देव कल्पना आणि धर्म कल्पनेमुळे आज जगाची खूप मोठी शक्ती आणि
खूप मोठा वेळ वाया जात आहे. देव कल्पना आणि धर्म कल्पना या आज समस्या आणि अडचनीन्सारख्याच
झाल्या आहेत आणि घातकही झाल्या आहेत. एकूण मानवजातीत या कल्पनांनी दुफळ्या माजवल्या आहेत.
त्या कल्पनांचा अतिरेक झाला आहे आणि माणूस ज्या सुखासाठी जीवन जगतो ते सुखच त्याच्या पासून
हिरावून घेण्या इतपत  त्याची शांती, स्थैर्य धोक्यात आणण्या इतपत त्या माजलेल्या आहेत. देवावरची श्रद्धा
माणसाचा माणूसपण मारून टाकू शकते, देवाची भीती हि भक्तीचीच दुसरी बाजू आहे. ह्या भीती आणि
हव्यासापोटी माणूस नको नको ते अत्याचार करीत आला आहे. छोट्या मोठ्या देवांना पशु पक्ष्यांचे नव्हे
तर माणसांचे, लहान मुलांचे देखील बळी दिले जातात. देवाच्या नावानं भोळ्या भाबड्या लोकांची अमाप
लूट चालते. हि लूट आर्थिक असते, भावनिक असते आणि लैगिकहि असते. श्रद्धेच्या नावाखाली लूट करणारे
तर दोषी आहेतच, पण ज्यांची लूट होते त्यांना ती लूट आहे असं वाटतच नाही. त्यांच्या दृष्टीने तो श्रद्धेचाच
भाग असतो. त्यामुळे या देव धर्म कल्पना आता कायमच्या बासनात गुंडाळून ठेवायची आणि प्रसंगी नष्ट
करण्याची वेळ आलेली आहे. या कल्पना विकृतीच्या अंतिम टोकाला येउन पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्या
थांबवणे किंवा त्यांचा लय करणे हे गरजेचे होऊन बसले आहे. तरच जग खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकेल. 

गेल्या शतकात दोनशे कोटी लोकांची हत्या धर्म, वंश, पंथ, राष्ट्र यावरून होणाऱ्या संघर्षा मुळे झाली आहे.
हि एक भयानक शोकांतिका आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला विशन्न करणारी अशी हि वस्तु स्थिती आहे.
वंशाच्या नावाखाली युरोप मध्ये साठ वर्षापूर्वी लक्षावधी निरपराध मानसं क्रूरपणे मारली गेली.

परमेश्वराची आठवण आपल्याला होते ती संकटाच्या वेळी आणि भीतीपोटी, आयुष्यात काही कमतरता भासली
म्हणजेच केवळ नाहीतर एरवी आपल्याला परमेश्वरी शक्तीशी काहीच देणं घेणं नसतं. देवळात जातो तेही काहीतरी
मागण्यासाठीच, आपण खरे भिकारीच आहोत. पण भक्त म्हणवून घेतो इतकंच.

परमेश्वराची तर कमालच आहे त्याने तरी आस्तीकांची जमात आणि विरोधी नास्तीकांची जमात का उत्पन्न होऊ द्यावी ?
उलट नास्तिकापैकी प्रत्येकाच्या श्रीमुखात देऊन त्यानं म्हणावं " हा बघ, मी परमेश्वर समजल ? या पुढे नास्तीक्पणा
सांभाळण्याचा मूर्खपणा करशील तर आणखी एक ठेऊन देईन" पण परमेश्वर असा काही करताना दिसत नाही.
तो आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्नच करत नाही. काहीच्या मते "देव" नाहीच या परिस्थितीचा त्याला
विषादही वाटत नाही. आपण मानसं संकटात आहोत म्हणून त्यानं कशासाठी मदतीला धावायचं ? तो काय
आपला नोकर आहे ? एक नारळ आणि फुलाची पुडी त्याच्या समोर ठेऊन नमस्कार केला कि सर्व काही झालं ?
त्याच्या बदल्यात आम्ही हजारो गोष्टींची मागणी करायची ?  देवधर्मा मुळे माणूस सज्जन, सत्यव्रत होतो
हे देखील अर्ध्य सत्य आहे. दुष्ट प्रवृतीची मानसं हि मुळातच दुष्ट असतात तशीच सुष्ट प्रवृतीची मानसं
मुळातच सज्जन असतात. अशी मानसं नास्तिक असली तरी चांगलीच वागतात .

देवाचं अस्तित्व कोणत्याही तार्किक पद्धतीने, बुद्धीला पटेल अशा प्रकारे सिद्ध होऊ शकत नाही.
बरेचजण देव का मानतात - सृष्टीचे संचालन इतक्या नियमबद्ध सुरळीतपणे चालत असल्याची प्रचीती
आल्यामुळे या मागे कुणी सर्व शक्तिमान सूत्रधार असावा, साध्य साध्य वस्तूही अपोआप तयार होत नाहीत,
त्यामागे कुणा तरी कुशल निर्मात्याची प्रतिभा व परिश्रम असतात, हा आपला नित्याचा अनुभव आहे, त्यावरून
विश्व निर्मितीच्या एवढ्या मोठा प्रचंड व्यापामागे अशीच अज्ञात शक्ती असली पाहिजे असा स्वाभाविकच निष्कर्ष
निघतो. त्या शकतीलच ईश्वर हि संज्ञा  देऊन माणूस मोकळा होतो. पण तेवढ्या साठी ईश्वर मानण्याची गरज नाही.

देव सर्वत्र आहे असं मानणारे आस्तिक हिंदू ' कणाकणात परमेश्वर आहे ' असं घोकतात. पण भक्ती फक्त देवळात
जाऊन करतात. मशिदी समोर किंवा चर्च समोर त्यांचे हात जोडले जात नाहीत. का ? तिथल्या कणाकणात
परमेश्वर नाही ? मुसलमान म्हणणार माशितीतच अल्ला आहे, त्या वरून युद्ध होणार, रक्तपात होणार.
खरं तर माणसानं माणसा सारखं वागण्या साठी कुठल्या देवाची किंवा धर्माची आवश्यकता नाही.

गरजूंना मदतीचा हात पुढं करणं, चारित्र संपन्न, सदाचारी असणं, कुणाचंही वाईट न करणं, पैशाचा 
गर्व न बाळगणं यालाच आपण पूजा समजायला हवं, आणि बुद्धिवादी , विज्ञाननिष्ट भूमिका घेऊन आपण जास्तीत जास्त लवकर देवधर्माला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !