माझी देवपूजा - कविता

🛕 *माझी देवपूजा* 🛕

पहाट झाली ,भूपाळी रंगली
राखुमाईच्या दारी ,पणती लागली

सोहळ्यात पूजा ,अभ्यंगस्नान
फुलारीत पुष्परास सुगंधी छान

भक्त मांदियाळी ,काकडारतीला
पंचारती, समई ,तुझीया पूजेला--

धूप, दीप ,उदबत्ती ,नंदादीप सभोवती
सुगंध दरवळला अवनी आसमंती--

निरांजनीची वात कापूराचा सुवास
देवताम्हण समोरी पळी पंचामृताची खास----

झेंडू मोगऱ्याची पुष्पमाला, सुगंधी
अत्तराची कुपी ,तुळशीमाला
वैजयंती----

सहान ,चंदनखोड ,उटी चंदनाची माथा
सप्तधान्याचा भोग ,तुजसाठी
पंढरीनाथा----

पंचपाळी ,हळदी ,कुंकू ,अक्षता
राखुमाईच्या माथी
अभीरबुक्का ,पांडुरंगा करंड्याची
झाली दाटी----

नित्य करू आरती,घंटा नाद मंदिरात
तुझे रुप चित्ती राहो,माझीया अंतरात


रांगोळी पिढेपाट ,सजला नैवेदया चा थाट
दयावे धुवोनिया ताट,, प्रसादाची वाट----

श्रीम. शिला पाटील .चांदवड. नाशिक.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !