प्रेमाची गोड फळे - बोधकथा

एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची.

एक दिवस तिच्या जवळ एक तरूण आला साधारण ३० एक वयाचा..

त्याने आजीला विचारले,"आजी संत्री कशी दिली ग?"

आजीने भाव सांगितला..

त्याने २ किलो संत्री विकत घेतली आणि त्यातल एक संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला,"आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?"

आजीने हात पुढे करत संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली.
आणी म्हणाली "लेकरा गोडच हाय की"

तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.

असच दुसरया दिवशीही तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला.
त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला.

असे बरेच दिवस निघून गेले.

आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.

एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले,"तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन"

तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला,"अग वेडे आजी रोज ही संत्री विकते पण ती स्वतः कधीच  ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो."

पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली,"अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी?  समदी संत्री गोड हायीत."

आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली ,"अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."

आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल.

मनात विचार करत असताना.शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली," बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मला मिळाल्या.

*तात्पर्यः*
*प्रेम माणूसकी कमी होत चाललीय*.
*तेवढी फक्त जपायला शिका*.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !