देशप्रेम - बोधकथा
*नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 'आझाद हिंद सेना' स्थापन केली.सेनेच्या खर्चासाठी देणग्या जमा करण्यात आल्या.*
*अशीच एक सभा संपल्यानंतर एका वृद्ध स्त्रीने सुभाषबाबुंच्या हातात चुरगाळलेल्या नोटा देणगी म्हणून दिल्या.* *म्हणाली, ' लेकरा, माझी ही सर्व शिल्लक तुझ्या सेनेसाठी घे , मी म्हातारी इतकच देऊ शकते! त्या म्हातारीचं औदार्य बघून सुभाष बाबुंचे मन भरून आले. ते म्हणाले , " माते , ह्या पैशाची गरज तुम्हालाच जास्त आहे . पण वृद्ध स्त्रीने ते नाकारले . आणि म्हणाली , " मला माझ्या देशासाठी इतकं तरी करायची संधी हवी." नेताजींनी तीला नमस्कार केला.*
🙏 *संदेश*🙏
*तात्पर्यः ज्याच्याविषयी प्रेम असते त्याचीच सेवा माणूस मनापासून करतो. देशसेवा करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.*

Comments
Post a Comment
Did you like this blog