हक्काची रोटी - बोधकथा

*एका राजाकडे एक संतपुरुष आले.प्रसंगवश गोष्ट निघाली हक्काचा रोटीची.राजाने विचारले , "महाराज , हक्काची रोटी कशी असते ? "महाराज म्हणाले, "आपल्या नगरीत अमुक ठिकाणी एक वृद्ध आजी राहतात त्या वृद्ध मातेला जाऊन विचार"*

    *राजा तिथे गेला व त्याने म्हटले.  " माते हक्काची रोटी पाहिजे." वृद्ध आजी म्हणाली, " राजन, माझ्याजवळ एक रोटी आहे , परंतु तिच्यातली अर्धी हक्काची आणि अर्धी बिना हक्काची." त्यावर राजाने विचारले अर्धी बिना हक्काची कशी?* 

      *वृद्ध आजी म्हणाली , " एक दिवस मी चरखा कातत होते. संध्याकाळची वेळ होती  अंधार पडला होता. इतक्यात तिकडून एक मिरवणूक निघाली.तिच्यात मशाली जळत होत्या. मी आपली अलग दिवा न जाळता त्या प्रकाशात अर्धी सुतगुंडी कातली.अर्धी गुंडी आधीची कातलेली होती. ती गुंडी विकली आणि पीठ आणले आणि रोटी बनवली. यासाठी अर्धी रोटी हक्काची आहे आणि अर्धी बिना हक्काची.या अर्धीवर मिरवणूकवाल्याचा हक्क आहे."*
*राजाने हे ऐकून त्या वृद्ध  मातेपुढे मस्तक नमविले.*

*तात्पर्यः स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली संपत्ती हीच तेवढी हक्काची संपत्ती .जिच्यात दुसऱ्याचाही वाटा आहे , ती संपत्ती आपल्या हक्काची नाही , तेव्हाच समाजाची स्थिती सुधारेल.*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...