संधीचे सोने - बोधकथा

नदीच्या किनाऱ्यावरील एका  झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते.
अचानक आकाशवाणी सुरू झाली...
"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "

       आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते.... काय करू...? काय करू.... ? काय करू... ?
दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते... माकड ओरडतो, "वेडी झालीस का? असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."

       तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, " अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते; पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे. संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास. संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास....!!!!"

         *तात्पर्यः  "मनातील आवाज"ही आकाशवाणी सारखाच असतो.जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून 'माकड' बनून राहावे लागेल ".*


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !