स्वतःसाठी जगताना - कविता

🌹स्वतःसाठी जगताना...🌹
   👇👇👇👇👇👇

   स्वतःसाठी जगताना..
   दुस-यांसाठी जगून बघ..
   स्वतःच्या आनंदापेक्षा..
   दुस-यांना आनंद देऊन बघ..

   स्वतःसाठी जगताना ...
   मरुन जातो माणूस बघ..
   दुस-यांसाठी जगणारा..
   मरुनही जगतो माणूस बघ….

   स्वतःसाठी जगताना...
   स्वार्थाचा नगारा फुलतो बघ..
   दुस-यांसाठी जगताना.…
   परमार्थ उठून दिसतो बघ..

   स्वतःसाठी जगताना...
   हजारवेळा मरतो बघ...
   दुस-यांसाठी जगताना..
   मरुनही अजरामर होतो बघ..

   स्वतःसाठी जगताना...
   मी आणि माझच बघतो बघ..
   दुस-यांसाठी जगताना...
   तुम्ही आणि आपणच उरतो बघ

   स्वतःसाठी जगताना.…
   स्वार्थाचा इमला वाढतो बघ...
   दुस-यांसाठी जगताना...
   परमार्थ उठून दिसतो बघ….

   तरही माणूस आज ....
   स्वतःसाठीच जगतोय...
   मी माझ आणि माझ्यासाठीच
   सर्वकाही नक्की साठवतोय..

   पण त्याला हे कुठ माहित..
   तो साठवितोय ते नश्वर आहे..
   एक दिवस इथच सोडून..
   सर्वाना जाव लागणार आहे ...

   म्हणून आजच्या माणासा..
   मी माझ आणि माझ्यापासून
   जरा तरी दूर व्हो..
   इथ काहीच नाही माझ तुझ ..

   एवढं तरी लक्षात ठेव....

   मंग कशाला गोळा करतो...
   हा माझा..तो माझा..आणि..
   तेही सर्व माझेच आरे मित्रा..
   इथ अजुन तुही निट तुझा ....

   नक्की हो नक्की तुझा नाहीस..
   मंग कशाला गोळा करतोयस..
   हे सर्व भामटे,लबाड आणि...
   आपमतलबी लोक...

   शेवटी तुही लबाडांचाच....
   पाठीराखा होणार आणि..
   तुही एकदिवस थांबणार..
   सर्वांच्या शिव्या खाण्यासाठी ..

   जमल तर सुधर नाहीतर..
   सोस तू तुझ्या कर्माची फळ..
   कारण तूच तुझा शिल्पकार..
   तूच तुझ्या दुःखाचा तारणहार..

                बाकी काय ?

        🌷शब्दांकन..🌷
        🌹प्रभातकवी..🌹
    श्री.यशवंत आ.गायकवाड
    शाहूपुरी,सातारा ..
    मो.नं.१)७९७२६९८४६४..,
            २)८०८७२६१३५३..!
    (टिप-उपरोक्त काव्य स्वतःत
    मशगूल असणा-या स्वतःच्या
    सूखावरुन दुस-याच्या सुखाची
    कल्पना करणा-या आणि
    भविष्यात दुःख सागरात
    नक्की लोळणा-या स्वार्थी
    मनोवृत्तीवर हा प्रहार समजावा
    तो वैयक्तिक कोणीही घेऊ
    नये ही कळकळीची विनंती)

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !