जाणून घ्या लग्न झाल्यानंतर मुलाच्या आयुष्यात होणारे बदल -जीवनशैली /Lifestyle

लग्नाचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण स्थान आहे. लग्न करणेहा प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असतो. लग्नाचा चुकीचा निर्णय हा फक्त दोन लोकांचा नाही तर दोन परिवाराचे जीवन उध्वस्त करू शकतो. म्हणूनच लग्नाचा हा महत्वपूर्ण निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. लग्नानंतर लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल येतात. लोकं मानतात कि लग्नानंतर जास्त ऍडजस्ट मुलींनाच करावं लागतं कारण त्या आपल्या कुटुंब आणि घर सोडून आलेल्या असतात. काही गोष्टीपर्यंत हे खरं सुद्धा आहे. 

परंतु लग्नानंतर फक्त मुलींनाच सर्व ऍडजस्ट करावं लागतं असं म्हणणं चुकीचं आहे. जरी मुलं आपले घर आणि परिवार सोडून येत नाहीत परंतु लग्नानंतर मुलांच्या जीवनात सुद्धा खूप बदल घडून येतात. लग्नानंतर मुलगा सुद्धा तितकंच ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो जितके एक मुलगी करत असते. लग्नानंतर माणसाच्या स्वभावात खूप सारे बदल येतात. 

जबाबदारीची जाणीव : 

कोणताही नातं जबाबदारीने निभावले जाते. लग्नानंतर एक पुरुष पहिल्यापेक्षा जास्त जबाबदार होतो. तो पहिल्यापेक्षा खूप मॅच्युर होतो आणि गोष्टींना जबाबदारीने हाताळू लागतो. त्यांना नात्यांची जास्त काळजी वाटू लागते. 

शेयरिंग करणे शिकतो : 

एकटं राहण्याची पण एक वेगळीच मजा आहे. लग्नाअगोदर पुरुष मुक्तपणे राहत असतो. परंतु लग्नानंतर त्याचे हे मुक्तपण थोडं कमी होते. त्याची पर्सनल लाईफ पहिल्यासारखी नाही राहत. त्यांना आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या पार्टनर सोबत शेअर करावी लागते. लग्नानंतर पहिला पत्नी नंतर मुलांसोबत वेळ विभागला जातो. 

सामाजिक दृष्ट्या ऍक्टिव्ह व्हावे लागते : 

लग्न दोन परिवाराचे मिलन असते. लग्नानंतर अनेक नाती आपल्यासोबत जुळून जातात. हि नाती खूप नाजूक असतात. त्यामुळे लग्नानंतर ह्याचे खूप विशेष ध्यान ठेवावे लागते. जे लोकं एकांतात राहणे पसंद करायचे त्यांना लग्नानंतर सामाजिक दृष्ट्या ऍक्टिव्ह होणे खूप मोठे आव्हान असते. 

काळजी करणे शिकून जातो : 

लग्नाअगोदर पुरुषांमध्ये निष्काळजीपणा थोडा जास्त असतो. ते आपल्या वस्तूंचे विशेष काळजी घेत नाहीत. परंतु लग्नानंतर ते जबाबदार होतात. ते आपली निष्काळजीपणा आणि बेफिकिरपणा दूर करून आपल्या पार्टनरचे खूप काळजी घेऊ लागतात. 

नात्यांमध्ये ताळमेळ राखावा लागतो : 

लग्नानंतर प्रत्येक नात्याला योग्य वेळ द्यावा लागतो. पत्नीच्या येण्यानंतर त्याला प्रत्येकासाठी वेळ काढावा लागतो. ह्याप्रकारे त्याला नात्यामध्ये ताळमेळ राखावा लागतो. 
मौजमस्ती कमी होते : लग्नानंतर पुरुषांची बॅचलर लाईफ जवळजवळ संपते. लग्नानंतर त्यांची पहिली प्रायोरिटी आपल्या लाईफ पार्टनरसाठी वेळ देणे असते. 

शौक-छंद ह्यावर आवर घालावा लागतो : 
लग्नानंतर जबाबदारी वाढल्याने पुरुषांना आपल्या शौक वर बंधनं घालावी लागतात. नोकरीसोबत त्यांना आपल्या परिवारासाठी वेळ द्यावा लागतो. वेळेच्या कमतरतेमुळे त्याला त्याचे शौक पूर्ण करता येत नाहीत. 

भविष्याच्या दृष्टीने सतर्क : 

लग्नानंतर व्यक्ती आपल्या भविष्याच्या दृष्टीने खूप सतर्क होतो. त्याच्यावर आपल्या पार्टनरला सुखी ठेवणे आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदरी असते.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !