पैशाच्या व्यवहारातून संबंध कसे जपावे - Trick

   पहिली बाजू 

सर्वात आधी जो व्यक्ती तुमच्याकडून पैसे मागत आहे त्या व्यक्तीला खरचं पैशाची गरज आहे का?? 
त्या व्यक्तीला पैसे कोणत्या कामासाठी पाहिजे आहेत चांगल्या की वाईट? 
तो व्यक्ती तुमच्या विश्वासात ल आहे का? 

जर,खरचं एखाद्याला खूपच पैशाची अडचण आहे,आणि त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास असेल, तुम्हाला जर तुम्ही दिलेले पैसे परत करेल असे ठामपणे वाटत  असेल तर तुम्ही त्याला पैसे देण्यात काही हरकत नाही,जर तुमच्याकडे पैसे असतील तर.. 

                  दुसरी बाजू 

असा व्यक्ती ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास च नाही अशा व्यक्तीला, पैशासाठी सरळ सरळ नाही म्हणा,पण बहुतेक वेळा काय होत असत, समोरील व्यक्तिला माहिती असत की आपल्याकडे पैसे आहेत, 
मग अशावेळी आपल्याला त्याला डायरेक्ट नाही म्हणायला पण जड जात... 

परंतु, असा व्यक्ती ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वासच नाही त्या व्यक्तीला तुम्ही  तुमच्या अडचणी सांगा,त्या व्यक्तीला कारणे सांगा....मुलांच्या शिक्षणाच कारण,घर खर्च कारण, हॉस्पिटल कारण...अशी खूप सारी कारण आहेत . 
वरील कारणे ऐकल्यावर कोणी परत तुमच्याकडे पैसे मागण्याचे धाडस करेल असे वाटत नाही...... 
चांगल्या साठी खोटं बोलले तर त्याला खोटं नाही बोलता येत..कारण ते खोटं पुढे जाऊन तुमच्या फायद्याचं ठरेल,जर एखाद्या वेळी तुम्ही पैसे दिलेच आणि पुढे जाऊन तो व्यक्ती तुमची रक्कम वेळेवर देतच नसेल तर, असे आधीच कारण सांगून विषय जागच्या जागी संपवावा. पुढे जाऊन वाद विवाद वाढविण्यापेक्षा आधीच कारण सांगितलेलं बरं.. 

पैशामुळे चांगले चांगले संबंध तुटतात...त्यात विश्वास खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो.. 


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा