जिवन विचार - 147
🌹 *प्रबोधन पर* 🌹
मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो, तु दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "
मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी १५० रू ऑफर केले कारण ते फारच जुने आहे."
वडिल म्हणाले, "आता मोहरांच्या दुकानात जा."
मुलगा मोहराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी २० रू अॉफर केले कारण ते खूप खराब आहे."
वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं.
तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला.
"बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी ५ लाख ची ऑफर दिली."
वडिल शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले,
"मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमच योग्य मूल्य आहे. स्वतःला चूकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले मूल्य माहित आहे तेच आपली प्रशंसा करतात. अशा ठिकाणी राहू नका जिथे आपले मूल्य कोणाला दिसत नाही."
आपली किंमत जाणून घ्या..
Comments
Post a Comment
Did you like this blog