◾कविता :- मीच माझा रक्षक
कोरोना संसर्गातून बचावासाठी ,
अंगिकारले होते मंत्र ।
मीच माझा रक्षक होईन ,
हेच सरकारने दिले तंत्र ॥
हाच महत्त्वाचा संदेश ,
महाराष्ट्रात सर्वानी पाळावा ।
स्वयं शिस्तीने एकमेकांपासून ,
अंतर सर्वानी ठेवावा ॥
संपूर्ण जगात घातला आहे ,
असा धुमाकूळ कोरोनाने ।
त्याला लगाम लावण्यासाठी ,
रक्षक बनावे या मंत्राने ॥
जीवनात आले कितीही संकट ,
आपल्यालाच बनावे लागते रक्षक ।
आयुष्य जगण्याला मदत होते ,
नाहीतर इथे अनेक आहेत भक्षक ।।
करुया आपण जनजागृती ,
"मीच माझा रक्षक" होईन ।
स्वस्थ राहा , स्वस्थ राहू दया ,
या मंत्राचा वारसा घेईन ॥
महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "
गोंदिया
=======================
Comments
Post a Comment
Did you like this blog