हुंड्याचे भोग - हास्य कविता

*हुंड्याचे* *भोग*

माय म्हणे बापूचं, वय झालं लई
बापाले सुटली , माह्या लगनाची घाई  ।

माह्या ओठावर नोयता , मिसरुडाचा पत्ता 
पोरींच्या  बापाईचा , याहाले  लागला जत्था   । 

पाहाले गेलो पोरगी ,  होती  वजनानं भारी
मी होतो काराचं , थे त माह्या पक्षाही कारी ।

तोंडाले राकडं , अन् वटाले पेटकाभर लाली 
चहा पोहे पाणी , यकाच वेळी घेऊन आली 

बाप म्हणे पोरगी बाकी हाय , हुड्याचं बोला 
चार बकऱ्या दोन भशी द्याहाले,  सासरा तयार झाला ।

लगीन झालं यकदाचं , हुंडा भी आणला संग 
चार दिसातच बायको , दाखवाले लागली रंग ।

दोही पाय  जोडून ,  बसे  पलंगावरी 
अन् रोजीस उपडे  , माही नाही आलेली मिशी  ।

सड्या सारवणापास्नं काम , मले कराले लावे
म्हणे हुंडा घेतलास बापाकडनं ,
भशीकड बोट दावे ।

म्हणून म्हणतो राजेहो ,  
            हुंडा नोका घेऊ 
माह्यासारख्या बायकोच्या,  
    लाथा नोका खाऊ  ।

   ✍️ सुनिल पोटे दिघोरी  ,  चंद्रपूर   हल्ली मु. राजुरा

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...