लग्नासाठी बायको - हास्य कविता



शीर्षक :-  लग्नासाठी बायको 

बघायला गेलो लग्नासाठी बायको 
दिसली ती मला जाडी 
मडक्यासारखं पोट दिसे
कारण, नेसता येईना साडी... 

लाल भडक लिपस्टिक 
तिच्या सुंदर मऊ ओठावर 
सावरता येईना पदर तिला 
म्हणून,नजर सारखी पोटावर...

पाहून हसली जेव्हा माझ्याकडे  
दात दिसले लाल-लाल 
चहा घेताना वास आली 
वाटलं  हा तर विमल चा कमाल... 

जाडजुड ती म्हशीसारखी 
मी तर शेंगे सारखा बारीक 
तिच्यासमोर मी म्हणजे 
वाळलेला खारीक... 

झाले आता चहा - पोहे 
निघायची घाई  लागली 
घरात बसून वाटत होतं
आता माझी वाट लागली... 

हात जोडून निघालो बाहेर 
आता सुटकेचा श्वास घेतला 
वाचलो रे बाबा त्या जाडीपासून 
नाहीतर वासेनेच ने असता जीव घेतला... 

  *अश्लेष माडे* *प्रीत*
  मु. कोहमारा जिल्हा. गोंदिया

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !