मी बायकोचा गडी - हास्य कविता

मी बायकोचा गडी

काय सांगू भाऊ तुम्हाले मी बायकोचा गडी
कंबर लागली माझी हिची धुता-धुता साडी

हिची सकाळची न्याहारी आम्लेट नी अंडी
मी घासतो बघा कसा खरखटी भांडी

जेवनात पाहीजे तीले दहीभाताच बोनं
माया मांग लागल रोजच शीळ खाऊन जीनं

ईलायती कुत्र्याले काखेत प्रेमानं गौंजारते
मले गावटी कुत्र्यावानीं पांदोपांदी हिंडवते

एक दिस मया हातान दुधच सांडल
त्या दिसी बायकोनं मले लई लई खुंदल

एवढ्या सार्या झाल्या मया हुंड्यापाई दशा
म्हणून धुतो भाऊ मी घरच्या कपबश्या

बायको म्हणते कशी माया बापानं दिला हुंडा
म्हणून करनार नाय मी घरचा काम धंदा

साषंगतो तुम्हाले भाऊ तुम्ही घेऊ नका हुंडा
नाहीतर मायावानी बायकोकडून घरी खुंदा

हुंडा घेणार्याच्या जगात वरती नसे माना
म्हणे भाऊ हुंडा देनं घेनं कायद्यान गुन्हा


                रविद्रं आत्राम
          रा. नांदगाव (पोडे  ) चंद्रपूर

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...