लगनघाई - हास्य कविता
*।।लगनघाई।।*
काय सांगू भाऊ तुले हाये वय माझं भरलं
अमदाच्या साली माझं लगीन हाय ठरलं
गोरी गोरी सुंदर मीनं बायको हाय पायलं
किती शिकली आहेस तू इचाराचं रायलं
बाप म्हणे तिचा कायी कमी नाय खाप्याले
तळ्यामागचं दंड हाये ते होईन नं तुमाले
सोनं घालीन लेकिले ढबू पायजं तेवढं देईन
सुखात ठेव जा लेकिले याची हमी मात्र घेईन
झालो मीबी लई खुश झालं महा मनावानी
कायलं नायी मनीन बापा एवढं सारं भेटतानी
घाई घाईत कसं बसं गेलं लगीनबी उरकून
बिनकामाची बायको मात्र घरात आणली चुकून
काम तिले सांगितलं तं माह्यावरच धावते
हुंड्यासाठी छळते म्हणून ठाण्याचा भेव दावते
मी सांगतो पोरहो लगण पैस्यासाठी नको कराल
नाय तं महावानी तुमीबी गडदात जाऊन पडाल
कवी :
*मारोती आरेवार* *कनेरी(गडचिरोली)*
Comments
Post a Comment
Did you like this blog