बायको माझी... - हास्य कविता

स्पर्धेसाठी:- हास्य कविता 

शीर्षक:- बायको माझी...


आधीचं तिचं सोज्वळ रूप 
 बघून वाटे जणू ती गुलाब,
 पण नंतरचा भांडखोरपणा 
 पाहताच मला लागे जुलाब!

 सुडौल जणू चवळीची शेंग
 आधी जशी लागली  रवीना,
आता वाढला कमरेचा घेर 
 आडवं वाढणं काही संपेना!

 आधी वाटायचा मला तिचा
 स्वभाव शांत आणि भोळा,
 पण आता का सांगु दादा 
दातओठ खात वटारते डोळा!

आधी मारायची नजरेने 
आपल्या प्रेमाचा तीर, 
पण आता भाऊ सतत
तिची चालू असते किरकिर!


आधी असायची फक्त
संसार आणि मुलांत व्यस्त,
पण आता सोशलमिडियावर 
घालते मिनटामिनटाला गस्त!

आधी फोटो काढायचं म्हटलं 
 कि, हासून पदर घेई लाजत,
 नि आता बाई काढते मटकत
वाकड्या तोंडाची सेल्फि नाचत!


कु. प्रतिक्षा (रूही)सदानंद कापगते.
साकोली, जिल्हा:- भंडारा

Comments

Popular posts from this blog

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾ललित लेख :- स्ञी

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स