माहया लगनाची गोष्ट - हास्य कविता
स्पर्धेसाठी-हास्य कविता
विषय-माहया लगनाची गोष्ट
काय सांगू लेका तुले
माहया लगनाची गोष्ट
तुमावानी पोरी पावाले
मले पडले नाही कष्ट...
एक दिवस असाच
बसून होतो घरामंदी
पाटलाची पोरगी
उभी रायली दारामंदी...
तिनं पाहयल माहयाकडं
लाज,लाज लाजली
लाजतांना भाऊ
लईच झ्याक दिसली...
नजरानजर झाली अन
माहं काळीज गेलं चोरीले
हिंमत करून लगनाच
इचारून टाकलं पोरीले..।
ते बी झाली तयार
मी बी होतो तयार
पळून जाऊन
उडवून टाकला बार...
तवापासून लोक मने मले
हाय रे संधीसाधू
मी मनल ,काय बी मनू दे
राजा राणी आपण सुखानं नांदू...।
सौ.कविता संगोजवार
मूल
Comments
Post a Comment
Did you like this blog