लाॅकडाऊन - हास्य कविता
कवि परिचय -
रमेश कृष्णराव भोयर
गोकुलधाम सोसायटी
भद्रावती , चंद्रपूर
दि. १५/५/२०२०
मो. न. ७०५८०७७७४६
कवितेचे शिर्षक. / लाॅकडाऊन /
--------- ++++++++
बायको माही गुणाची मोठ्या मनाची
लगन झाल्यापासून झोप नाही
सुखाची
वर्ष दोन झाली तरी पटून नाही
रायल
जीवन सारं मी तिलेच वायल
धड काही वागत नाही
भाव मले देत नाही
सांगितलेल आयकत नाही
मले काही देत नाही
घरी आली तवा शेंग होती शेवग्याची
आता झाली जशी भेली कोहळाची
बोललो काही वसकुन ती धावते
पिरमाचे दोन शब्द कधी नाही
बोलत ते
देवासारखा मले कोरोना पावला
सरकारन म्हणे लाॅकडाऊन केला दिवसभर आता घरीच रायतो मी
कामाला तिचेहातभार लावतो मी
एक दिवस माह्या जवळ आली ती
गुलुगुलु गोष्टी सांगत होती मले ती
छत्तिसचा आकडा त्रेसष्ठ झाला
संधिचा फायदा मी घेऊन घेतला
लाॅकडाऊनचा फायदा घरी माह्या
झाला
घरात माह्या पाळणा हलू लागला
नेहमीचा खोकला सुंठीवाचून गेला
कोरोनाले मी धन्यवाद दिला
रमेश कृष्णराव भोयर
गोकुलधाम सोसायटी
भद्रावती, चंद्रपूर
मो.न. ७०५८०७७७४६
Comments
Post a Comment
Did you like this blog