टक्कल - हास्य कविता
कविता - टक्कल
माझ्या छोट्या भावाचं
बघून मी टक्कल
मी त्याच्या डोक्यावर केस
येन्यासाठी शोधली एक शक्कल
डोक्यावर केस येण्यासाठी
नेटवर ओपन केले गुगल
वेगवेगळे नुसके शोधले
लावले त्याच्या डोक्यावर
वडाच्या पारंब्या ठेचुन तेलामध्ये ठेवून
तेलही लावले बाळाच्या डोक्यावर
हळदी मध्ये गोमूत्र मिसळून
तेही झाले लावून डोक्यावर
तरीही बाळाच्या डोक्यावर
आले नव्हते केस
मात्र तेवढा आली मम्मी आणि
ओरडली मला धरले माझे केस
असं काय लावतेस तू बाळाला
म्हणल्यावर मी म्हणले बाळाला पडले टक्कल
त्याच्यावर केस उगवण्यासाठी लावले
मम्मी म्हणाली आहे का तुला जरा अक्कल
काल काय करुन डोक्याला लावले
त्याच्या डोक्याला पडले नाही टकल
त्याला दाट केस येण्यासाठी वारकाकडून
त्याचे करून आणले टक्कल.
अनोमा दिलीप मालसमींदर. परभणी.
Comments
Post a Comment
Did you like this blog