कोरोना - हास्य कविता


😃🌹🌹 *कोरोना* 🌹🌹😃

असा कसा चीनने राजा भरदिवसा गजब केला,
कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला.

किड्याकिटकुराचे लागले होते म्हणे डोहाळे ,
मास खाणे सोडले ,निघाले कोंबडीवाल्यांचे दिवाळे.
याचे गुणसूत्र सापडत नाही ,डॉक्टरांले परेशान केला,
कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला.

कोणता दूध पाजला ,कोणाला काही माहीत नाही,
वाढ लई जोरात, रांगाचा सोडून धावतच जाई .
सैतान भारी गावहिंड्या, राखून पोलीस वैतागून गेला,
कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला.

ठुसक्या लेकाचा चपटनाक्या ,टांगा याच्या लांब,
हात पसरून जिरवतो जगाची, कोणता हो बॉम्ब.
समुद्रमंथन झाले कोठे ,कोणता हलाहल पेला ,
कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला.

जलमला कोणत्या नक्षत्री ,कोणते फिरले वारे,
हिंडणे झाले बंद ,घरात लपाले नाही सुधरे .
बाहेर पोलीस सुजवे ,बसुबसू एका जागी मूळव्याध फुटला,
कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला.

थाळ्या वाजवलो जोरात ,वाटलं झाला असन बहिरा ,
भोकना कर म्हणे दिवा लावून ,सांगत होता सोयरा .
टीव्हीवर याचा हैदोस पाहू पाहू ,अंग घामाने भिजला ,
कोणता गर्भ ईच्याभिन कोरोना पैदा झाला.

🙏लक्ष्मण खोब्रागडे 🙏
जुनासुर्ला ,ता. मूल ,जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !