जीव मोजतो अखेरच्या घटका - हास्य कविता


*जीव मोजतो अखेरच्या घटका*

दिसताच मोठी मालदार पार्टी
ताबडतोब लग्नाची लागली आस
लग्नानंतर पाहून डौलदार रूप 
झाला गुदमरून मरण्याचा भास

बेढब अगडबंब ती शरीरयष्टी
पाय टेकवताच जाणवे भूकंप
गडगडाटासम आवाज ऐकता
श्वासही अवचित पुकारती संप

प्रभाव म्हणू की दहशत तीची
शब्द चुकीचा पडो न तोंडून
क्षणार्धात जायचा जीव शरीरातून
घेतलं तीने जर मिठीत आवळून

पाणचट तीच्या विनोदांवरही
उगा खळखळून लागतं हसावं
वायफळ तीच्या बडबडीला तर
जबरदस्तीनं जीवनामृत समजावं

किळसवाणं जरी तीचं हसणं
वाटून घ्यायचं नेहमीच मोहक
गुलाबी गारव्याचं करावं नाटक
सहवास जरी भासला दाहक

हिंडीबाच्या या मगरमिठीतून
कळे न कशी करावी सुटका
नको रोजचं तडफडून मरणं
जीव मोजतो अखेरच्या घटका


         *प्रकाश नारायण फर्डे*
           *शहापूर (ठाणे)*

Comments

Popular posts from this blog

रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा

अब्राहिम लिंकन यांचे 37 अनमोल विचार

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायक विचार

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

मन म्हणजे काय ?

◼️ ललित लेख :- सरपंच कसा असावा ?

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !