तिन धूर्त आणि ब्राम्हण - बोधकथा

एका छोट्या गावात एक ब्राह्मण राहत होता. लोंकाच्या घरी पूजा-अर्चा करून तो स्वत:चे पोट भरीत होता . त्याच्या कामावर खुश होवून एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला एक शेळी भेट दिली. 

ती शेळी खांद्यावर उचलून घेऊन तो ब्राह्मण आनंदाने घरी निघाला. ब्राह्मण घरी निघाला तेव्हा रस्त्यात ३ धूर्त चोर उभे होते. त्यांनी ब्राह्मणाला फसवायचे ठरवले. आपणच शेळी पळवायची असा त्यांनी विचार केला. ब्राह्मणाला लांबूनच येताना बघितल्यावर ते तिघेही पांगले. रस्त्यावर ठराविक अंतरावर लपून बसले. 

रस्त्यात एका निर्जन स्थळी पहिला चोर एकदम ब्राह्मणासमोर येउन उभा राहिला. तो म्हणाला, ' अहो तुम्ही कुत्र्याला कशाला खांद्यावर घेतले आहे? ब्राह्मणाने एकदा शेळी कडे पहिले प्रश्न विचारणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष केले आणि तो चालतच राहिला. थोड्या वेळाने दुसरा चोर ब्राह्मणासमोर आला. त्याने विचारले, ' अहो तुम्ही गाढवाला का खांद्यावर घेतले आहे? अशीच गोष्ट तिसऱ्या चोराची. आता मात्र ब्राह्मण घाबरला त्याने मनाशी विचार केला अरे शेळी आहे कि भूत ? सारखाच आकार बदलत आहे . 

थोडे पुढे जाऊन ब्राह्मणाने शेळी रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि तो पळून गेला. ३ चोर एकत्र आले त्यांनी शेळी पकडली. तिला घरी घेऊन गेले. 

तात्पर्य - ऐकावे जनाचे करावे मनाचे. " 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !