तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं😊 - हास्य कविता

स्पर्धेसाठी

कवितेच शीर्षक:
तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं😊

एक दिवस कॉलेज मध्ये एका मुलीचे  नुकतेच ऍडमिशन व्हायचं ,तिला बघताच माझे मन आनंदून जायचं ,तिने हळूच माझ्याकडे बघायचं ,बघून अलगद हसायचं, मला देखील ते आवडायचं ,तीच माझ्यावर कधीच नसायचं ,पण तरीही माझ तिच्यावर  प्रेम असायचं!😊

तिने तिथुन निघुन जायचे ,मि देखील माझ्या वर्गात जाऊन बसायचं ,इतक्यात तिने माझ्या वर्गात शिरायचं ,पाहून तिला मी तिच्या शेजारी येऊन  बसायचं ,तेव्हा तिने माझ्याकडे रागाने पाहायचं ,तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं!😊

संपता लेक्चर मी तिच्याकडे हळूच जायचं, आणि तिला नोट्स मागायचं ,पण तिने मात्र चारचौघात नाही म्हणायचं, आणि त्या नाकारामुळे सगळ्यांच माझ्यावर  हसायचं, मी विचारलेल्या प्रश्नांचे वाटूळ व्हायचं, तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं !☺️

कॉलेज सुटल्यावर मी तिच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत जायचं, ती सायकलीवर मि गाडीवर असायचं, सायकल चालवताना तीनं मागे मागे वळून माझ्याकडे पाहायचं, पाहून न पहिल्यासारखं कारायचं ,तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं !😊

थोड्यावेळात तीच घर यायचं, ती ने सायकलीवरून खाली उतरायचं, पुन्हा मागे वळून पाहायचं, आणि घरात जाऊन तीच ते काळ कुत्र माझ्यावर अंगावर सोडायचं, त्याला बघताच मी तिथून सुसाट पळायचं,  तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं!😊

बघता बघता कॉलेज चे ते वर्ष संपून जायच, निकालाचे पत्रक हातात यायचं, ते पाहून मन मात्र  दुखायच ,कारण मी तिच्या प्रेमात 2 विषयात नापास व्हायचं ,तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं!😊

थोड्या दिवसात  तिचे लग्न जमायचं, मी तिच्या लग्नात जायचं ,आणि सगळ्यात पाहिले तिच्या नवऱ्याला पाहायचं, त्याला पाहून माझे टाळकं सारकायच, नेहमी तिला विचारावंस वाटायचं ,या टकल्यापेक्षा माझ्यात तुला काय कमी दिसायचं, तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं!😊

ती बसल्यावर जेवायला मी तिला जाऊन वाढायचं, वाढताना तिने पुनः माझ्याकडे पाहायचं, पाहून लगेच तोंड वाकडे करायचं, तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं !😊

मी तिथून उठुन निघून जायचं, दूरवरून तिला सासरी जाताना रडताना पाहायचं, थॊड मी देखील रडायचं, कारण  कोणी तरी आपला जवळच गेल्यासारखं वाटायचं ,तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं !😊

तीन चार वर्षांनी ती मला पुन्हा दिसायचं, बघून माझ्याकडे तिने थोडस हसायचं, मग मी हळूच तिच्या जवळ जायचं ,आणि तिच्या सोबत बोलायचं, आमचे बोलणे सुरू असतानाच शेवटी तिच्याच मुलाने मला मामा म्हणायचं, तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं😊

कविता आवडल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा

अक्षय सितापुरे (अहमदनगर)
8308930957

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !