लॉकडाऊन मधील गंमती जंमती - हास्य कविता

😜स्पर्धेसाठी विनोदी कविता😜
_________________________
शीर्षक- लॉकडाऊन मधील गंमती  जंमती                            
_________________________

हल्ली घरी बसल्यापासून,
बायकोची सुरू झाली हुकुमशाही.
ती कोचवर बसून खा खा खाई,
मी मात्र बैलासारखा राबत राही.

चीनची बारीक डोळ्यांची कोरोना बाई,
बघा घेऊन आली मोठं विघ्न.
हातांना मेंदी ऐवजी हॅन्डवॉश लागे,
आता आमच्या नशिबी कुठे लग्न? 

२४ तास गादीवर उभा आडवा लोळून,
आता नवीन गादी पार झिजली.
रात्रभर घुबडासम राहतो जागा,
आजूबाजूची सगळी मंडळी बोक्यासम निजली.

संचारबंदी कायदा मोडण्याचा,
ज्या महारथींना  आला माज.
पोलिसदादांनी वेताच्या लाठीने,
त्यांची केली खूप चांगली मसाज.

पशुपक्ष्यांना बंदिस्त करणारा,
स्वतः घररुपी पिंजऱ्यात उंदारासम राहतो.
पशुपक्ष्यांना स्वतंत्रपणे बाहेर फिरतांना ,
खिडकीत बसून माकडापरी  पाहतो.

तुम्ही हसण्यावारी घेऊ नका,
हा लॉकडाऊनचा काळ.
बांड्या नाकात कापूस येईल अन्
काळया गळ्यात फुलांची माळ.

✒️ श्री. संदीप विठ्ठल जगताप, ता. शहापूर, जि. ठाणे.
मो. नं. 9271684366

Comments

Popular posts from this blog

कविता :- आतुरता

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

जिवन विचार - 52