माणूस हसण्याची शक्ती विसरला तर ?
जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल.
आता हसायला कुणाला आवडत नाही ? पण इथे वेळ कोणाकडे आहे ? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ.सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे.इथे हसायचे म्हंटले तरी लोकांच्या जीवावर येते काहीना तर हसायचे म्हंटले तर रडायलाच येते!
मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून देवाने कल्पनाशक्ती दिली आणि जे आहे ते सुखमय ह्वावे यासाठी विनोदबुद्धी दिली.
जीवनात सदा सुखी व आनंदी असावे असे वाटणे स्वाभाविक आहे परंतु वास्तवात तसे होत नाही आणि वास्तव सुसह्य फक्त 'विनोद'च करू शकतो.कारण हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते.ताणतणाव कमी करण्याचे कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद!
विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात.काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात.अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल.किंवा एखाद्या विनोदाला आपण 'क्या टायमिंग है बॉस' अशी कॉम्प्लिमेंट देऊनहि गेलेलो असेल.
काल्पनिक विनोद असतात ते अधिकतर प्रचारात असतात आणि ते प्रवाही होऊन जातात मात्र त्यांच्या उपत्तीकाराची काही नोंद राहत नाही. काही विनोद सूचक पण चावट असतात.ते सांगनार्याच्या तोंडापेक्षा ऐकणार्याच्या कानात अधिक फुलतात.
ज्यांना विनोदबुद्धी नाही त्यांच्यात ती उत्पन्न करणे आणि ज्यांच्याकडे थोड्याप्रमाणात आहे त्याची वाढ करणे असे काम काही विनोदवीर करत असतात.'विनोद' हे अमर असे साहित्य आहे त्यामुळे ते सर्वांच्या मालकीचे आहे.
क्रिकेटमध्ये कितीही चांगला बॉल टाकला व तो खेळपट्टीच्या बाहेर पडला व दिशाहीन पडलातर त्याला वाईड बॉल म्हणतात.त्याचप्रमाणे स्थळ ,काळ व वेळ न पाहता केलेला कोणताही विनोद कितीही चांगला असला तरी दाद मिळवू शकत नाही कारण त्याला ' वाईड जोक' म्हणतात.
काही विनोद सोज्वळ हि असतात तर काही विनोद एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर केलेले असतात त्यावर लोक हसले तरी त्याला चांगले विनोद म्हणता येणार नाही.
काही लोकानातर विनोद केलेलेच समजत नाहीत हाही एक मोठा विनोदच आहे म्हणा.विचित्रपणा किंवा विसंगतीमुळे खूप विनोद होतात आणि अशा विसंगती माणसांच्या जीवनात ठासून भरलेल्या असतात.आजचे जीवन खूपच ताणतणावाचे झाले आहे त्यावर जालीम एकमेव उपाय म्हणजे विनोद.त्याने जीवन सहज आणि सुंदर बनते.
आयुष्यातील दुखाचे हसून विस्मरण करणे हा खरा विनोदाचा उद्देश आहे.ज्या विनोदात हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद म्हणजे 'सर्वश्रेष्ठ विनोद'. हास्यविनोद म्हणजे मोठा मानवधर्म आहे त्यामुळेच तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन'
आपल्या जीवनातील हास्याचा जास्तीत जास्त आनंद मिळावा नियती कुणालाही चुकली नाही आणि चुकनारही नाही.
जिथे जिथे तणाव आहे तिथे विनोदाची गरज आहे.विनोदामुळे रक्ताला उसळी मिळते.नसानसातून वीज सळसळते मेंदू तल्लख बनते आणि शरीर व्यवस्था ठीकठाक बनते. देवाने माणसाला ज्या देणग्या दिल्या आहेत त्यातील हास्य एक मौल्यवान देणगी आहे.

विनोदाचे फायदे :
मानवी जीवन हे सुखदु:खाने भरलेले आहे. जीवनात सुखापेक्षा दु:खाचे क्षण जास्त असतात. दु:ख आहे त्या तीव्रतेने माणसाला भोगावे लागले, तर तो दु:खाच्या ओझ्याखाली एवढा दबून जाईल की त्याला जीवनातील उपलब्ध सुख उपभोगताही येणार नाही. अशा वेळी विनोदामुळे 'हास्य' या देणगीमुळे माणसाचे जगणे सुसह्य होते. 'विनोद' या शब्दाचा अर्थच मुळी 'दुसरीकडे वळवणे' असा आहे. विनोद माणसाच्या मनाला दु:खापासून दूर सुखाच्या दिशेने वळवतो.
तो मानवी जीवनातही सुख आणि दु:ख यांच्यात सुवर्णमध्य साधतो. तो माणसाला न दुखवता त्याच्यातील दोष सांगतो. तसेच, तो माणसातील दोषांसकट त्याचा चांगुलपणाही दाखवतो. जीवनातील ताणतणाव हलके करतो. तो हसता हसता शिक्षण देतो. त्याचे मानवतेवर प्रेम आहे तो माणसाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतो.
म्हणूनच विनोदाला समाजाच्या उच्च संस्कृतीचे निदर्शक मानतात........

Comments
Post a Comment
Did you like this blog