लॉकडाऊन मुळे - हास्य कविता
*लॉकडाऊन मुळे ..* (हास्यकविता )
बाप म्हणे मले बापू
तुह्य लगन लावू थाटात...
चांगला फेटा घ्या साठी
मंग म्या गलो हाटात...
महागाच्या लग्न पञिका,
वाटल्या घरोघरी जावून...
चांगले वाजे वाले बी
भाऊ आलो होतो पावून...
कोट अन् शेरवानी भाऊ
घेवून होती झाली...
नवरदेवाची गाडी बी
भाऊ बूक होती केली...
अडवॉन्स देऊन भाऊ
मंगलकार्यालय बुक केलं..
मोदीजींची बातमी पाऊन
मनलं बईन हे का झालं.. ?
शुंभ मुहूर्तः पाऊन भाऊ
माह्य काळलं होतं लगन...
लावाची होती हळद हाताले
लावा लागत आहे साबन....
रंगवलं होतं सपन लग्नाचं,
माह्या हनीमुन गेला राऊन...
जागो जागी या कोरोनापाई
बईन झाला 'लॉकडाऊन'.....
... ✍ *अरूण घोरपडे, चंद्रपूर*
ह. मु. गोडपिपरी
भ्र 9657041041
Comments
Post a Comment
Did you like this blog