जिवन विचार 149
••●●★‼ *विचार धन* ‼★●●••
*महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?*
*जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.*
_________________________________
••●⚜‼ *जय श्रीकृष्ण* ‼⚜●••
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
Comments
Post a Comment
Did you like this blog