माह्या सायीचं लगीन - हास्य कविता

*🖊️ स्पर्धेत.. हास्य कविता..*

*शीर्षक.. माह्या सायीचं लगीन*

*काय सांगू राजे हो तुमाले मी*
*माह्या साईच्या लग्नाची मजा*
*सगळे होते खुशीत राजे हो* 
*अन मले भेटली होती सजा.*! 1! 

*नवरीची बहीण मले म्हणे दाजी* 
*काऊन तोंड इचकून बसता* 
 *सगळेच हायेत खुशीत अन*
  *तुम्ही नाराज काऊन दिसता.*! 2!  

*म्या मनलं तिले साई असते*
*दाजीची आधी  घरवाली* 
*तिच्या लग्नात सांगा मले तुम्ही*
*मी  कसा राहू राजे हो खुशाली.*! 3 ! 

*नवरदेवाची वरात आली दारी*
*चांगलीच त्याईची आवभगत केली*
*नटून थटून नवरी होऊन राजे हो*
*मायी सायी मांडवात आली .*! 4 !    

*बायको म्हणे तुमचीबी बईन हाय*
*चला अकशीदा टाका डोकशावर*
*माये डोये आले भरून पण म्या*
*माहया मनाले घातला आवर*.! 5! 

*तवापासून  राजे हो मी माह्या*
 *सायीले  माही  बहीणचं मानतो*
*दिवाइले साइले आणतो घरी*
*लुगडं चोळी घेऊन सासरी धाडतो.*! 6.! 

*****************************
*🖊️ सौ. शारदा मालपाणी.*
*(काव्य शारदा )*©️®️
*अमरावती.*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !