विनोदी काव्य - हास्य कविता

स्पर्धेकरिता 
हास्यविनोदी काव्य
-------------------
पळत पळत गेलो गावाला
नवरी मुलगी ती ठरवायला ! 
एक सोडून चार त्या मुली
प्रत्येकीचा अंदाज निराळा !१! 

पहिली मुलगी अति सुंदर
काही तिला कळेना अंतर ! 
कमल नयनी असे कोमल
दृष्टी नसे दिसेना निरंतर !२! 

दुसरी मुलगी फारच छान
अप्रतिम रूप लावी ध्यान !
बोलण्यास ती नाही तयार 
न शिकल्याने दिसे अज्ञान !३! 

तिसरी मुलगी लावण्यवती 
सौंदर्य तिचे सारेच वर्णिती ! 
प्रश्न विचारता नाही उत्तर 
कधीच नसे शब्द बोलती !४! 

चौथी मुलगी फार गुणवती
रंग सावळा गाणे ती गाती ! 
आवडली म्हणतानाच कळे
स्वतःच्या पायाने चालेना ती !५! 

मुलगी पाहण्याची हौस मोठी
कशी झाली ही फटफजिती ! 
मग ठरवले एकच त्यादिवशी 
घाई ना करायची लग्नासाठी !६! 
-------------------
-श्री.श्रीगणेश पुरूषोत्तम शेंडे. 
मु.पो.भुईंज ता.वाई जि.सातारा.
भ्रमणध्वनी - 8605139140.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !