◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...
हास्य काव्य स्पर्धा
दिनांक-१५-५-२०२०
😀😁😅😂🤣🤪😜🙄
हास्य काव्य रचना
म्हातारा चाललंय लंडनला
टकल्यावर टोपी नी पांढरी मिशी,
नेसून धोतर घेऊन काठी,
म्हणे आणीन एक जीवनसाथी,
म्हातारा निघाला लंडन साठी...
म्हाताऱ्याला लई झाली गडबड,
करे मनातल्या मनात बडबड,
जाईन मी आता लंडन,
जरूर आणीन रविना टंडन...
म्हातारा फिरवतो मिशिवरून हात,
नाही त्याच्या तोंडात दात,
सुपारी खायला जडजड होई,
तरी म्हाताऱ्याला लग्नाची घाई...
म्हाताऱ्याने बघितली एक मुलगी,
करू लागला तिच्याशी सलगी,
मुलीने विचारले म्हाताऱ्याच नाव,
म्हातारा करू लागला काव-काव...
म्हाताऱ्याला वाटली लग्नाची हौस,
वाटेत पडला जोरदार पाऊस,
गारपीठ वादळ आणि पाऊस भरभिर,
टकल्यावर पडली भली मोठी चीर..
राकेश प्रभाकर धोटे,
गडचिरोली.
मो-९४०५१९४६३०
😀😆😅😂🤣😇😋😛😳
Comments
Post a Comment
Did you like this blog