बायको - हास्य कविता
० बायको ०
दोस्ताइले सांगतो मी, घाबरत नाही बायकोले.
बायको माही हिटलर, काय सांगू कोणाले.
बिन पाण्यानं माही, हजामत होते रोज.
ईले पहासाठी मीनं, केवढी केली होती खोज.
लगन झाल्यापासून, माहं तिले पटत नाही.
सांगकाम्या व्हावं, असं मले तरी वाटत नाही.
तिच्या मनासारखं झालं नाही, ती मस्तनच चिडते.
डोस्क्याचे केस धरून माहेवाले, माह्या उरावर बसते.
पण माह एकच तंत्र, आपण आपलं चुपचाप शांत.
माय मने मले तू शांत राय, ती करलचं आकांत.
माईचा माह्या सल्ला, फायदेशीरच ठरला.
बा नं केलेला प्रयोग , हा एकच इलाज उरला.
विझण्यापूर्वी दिवा जसा,भकभक करून पेटते.
मग स्वयंपाक नाही पाणी नाही उगीमूगी लेटते.
पोट्टे म्हणते बाबा, माय कायले झोपली?
मी कायले सांगतो, माही इतर पितर घेवून थकली.
कसंतरी स्वयंपाकाचं ,जमते राव मले.
मग पोट्टे आनं मी उठवतो ,हालवू हालवू तिले.
तुम्ही माहं ऐकत नाही म्हणून, मारते कशी ताण.
आता नाही बोलणार म्हून, धरतो दोन्ही कान.
बायको कडचे नातलग सारे ओलिताचे धनी.
माह्या कोरडवाहू रिश्तेदाराईले पाजल कोण पाणी.
राजे हो लग्न एक जुवा आनं आपण त्यातले जोकर.
बरं झालं बरं, नाही तर ज्यांन जोडून देलं ,त्याच्या डोस्क्यावर खापर.
सुनील कोवे
बल्लारपूर
8999254744,9422839573
Comments
Post a Comment
Did you like this blog