कॉलेज कुमार - हास्य कविता

*हास्य काव्य स्पर्धा*             
*हास्य कविता*___ *कॉलेज कुमार*                  

तंग पॅन्ट वर डगला। 
केसांची कट करतो पगला । 

फाटलेली पॅन्ट काय ही फॅशन। 
दळभद्री ठिगळे नुसते मेले अवलक्षण। 

ते काय अवतार घाली वरमुडा  भारी। 
जशी चालली कबड्डी खेळायला स्वारी। 

वसुंधरेवर पहा मुरडत आल्या अप्सरा।
कमी कपड्यात अटीट्युडचा  फाजील पसारा। 

इम्प्रेशन साठी पैसा उधळतात। शिक्षणाच्या नावाखाली मजा मारतात। 

सोबतीने ड्रिंक झोडू --चला चारमिनार ओढू। 
एकमेकांवर वेगळेच इम्प्रेशन पाडू। 

मुलींचे तर काय सांगावे सौंदर्याचा नखरा भारी ।
स्वतःला समजतात जणू ऐश्वर्या कुमारी। 

सुसंस्कार झाले फस्त, रात्रीचे इंटरनेट खेळ चाले। 
स्मार्ट फोन पालकांचे हे दुर्लक्षीत सोहाळे। 

हे कॉलेज कुमार __काय-- अन कुमारी काय-- हे कधी सुधारणार--- हे कधी सुधारणार? 
हे अजून बिघडणार ---हे अजून बिघडणार --- 

"काय म्हणता सारस्वतांनो"- कळतय पण वळत नाही कोणीच ऐकत नाही। 

पालकांनो सु संस्काराचा लावा लगाम ।तेव्हाच तयार होतील सीताराम।²-------- 

धन्यवाद 
*सौ रंजना महेंद्र बोरा* 
*आशु कवयत्री* 
*सिन्नर जिल्हा नाशिक*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !