तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हा लेख एकदा नक्की वाचा !

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तुम्हाला स्वतःहुन स्वतः साठी प्रयत्न केले पाहिजे तेही न थांबता... 
आपले आरोग्य, आपली आकांक्षा या गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते पण इतकेही नाही जेणे करुन आपल्यालाच त्याचा त्रास होईल... 
विचार करणे चांगले असते... बुद्धीची क्षमता वाढते... परंतु त्रास देऊन विचार करू नए.... तुम्हाला आनंदी राहायचे आहे... 
मग तुम्ही सकाळी उठेपर्यन्त ते रात्री झोपेपर्यन्त सकारात्मक विचार करा... 
मन आणि बुध्दि एकत्र आणण्याचा प्रयत्न करा... 
सकाळी मेडिटेशन करा... 
खुप कामं आहेत जीवनात पण दररोजचे रटाळ काम वाटणारे एकदा तरी आनंदाने करुन पहा... 
कोणाची तरी मदत करुन पहा... 
स्वतः ला सुद्धा कधी कधी स्वतः शाबासकी द्या... 
मन शांत ठेवून डोळ्यांनी काय काय छान छान पाहू शकतो अनुभवू शकतो याचे विचार करा... 
तुम्हाला तणाव मुक्त होण्यासाठी कोणती गोळी किंवा औषध कामी नाही येणार... 
तर तुम्ही स्वतः त्याचे औषध आहात.., 
धन्यवाद...

, वय वाढत चाललय , हे स्विकारलं तरच,  आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. 
प्रत्येक वयोमान वेगवेगळ्या वाटेवर सप्तरंगी जीवन घेऊन येतं. त्याचा आपण आनंद घ्यायचा असतो. 

केस काळे करायचेत? 🙁 

तर,  केस काळे करा 
  वजन कमी करायचय ?😩 

तेपण करा. 

मनपसंत कपडे घालायचेत ? 😄 

खुश्शाल  घाला. 😁 

लहान मुलांसारख्या उड्या मारावाश्या वाटतात ?😁 

मारा उड्या.😁 

आरश्यात पाहून आपल्या आहे त्या अस्तित्वाचा स्वीकार करायला शिका.. 

कोणतही क्रिम किंवा फेसपँक तुम्हाला गोरं करणार नाही.😁 

कोणताही शँम्पू केस गळती रोखू शकणार नाही.😩 

कोणतेही तेल टकलावर केस उगवू शकणार नाही.😄 

कोणताही साबण बच्चों जैसी कोमल स्कीन देणार नाही.😩 

मग तो प्रॉक्टर & गँम्बल असो कि पतंजलि. 

सगळेच जण आपआपली दुकानं थाटुन बसलेत. 

हे सगळं नैसर्गिक असतं. 
वयोमानाप्रमाणे शरीरात बदल होत जातात. 
जुन्या मशीनला मेन्टेनन्स करून अपटुडेट करू शकतो . पण नवीन नाही करू शकत. 

कोणत्याही टुथ-पेस्टमध्ये नमक नसतं व कोणत्याही टूथ-पेस्ट मध्ये निम नसतो. 

पोट सुटलंय सुटू दे, त्यासाठी लाज वाटू नये, आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहतं. वजन पण त्या प्रमाणे कमी जास्त होत राहतं. 

ईन्टरनेट , सोशल मिडीयावर वेगवेगळ्या उपदेशांनी उच्छाद मांडलाय. 

" अमुक खा , तमुक खा, गरम खा. थंड प्या , हे पिऊ नका, हे खाऊ नका, कपाल भाती, सकाळी लिंबूपाणी , गाईचं दूध, जोरात श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, उजव्या कुशीवरून उठा, हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात, नाचणी खा, वगैरे वगैरे..... 

वरील सारे उपदेश वाचले तर , अस वाटतं, आयुष्य बेकार आहे. धड काही खावू शकणार नाही . धड जगू शकणार नाही आणि मानसिक तणावाखाली डिप्रेशनची भर पडेल ती वेगळी... 

ऑर्गेनिक, एलोवेरा, कारलं , मेथी, पतंजलि , प्रॉक्टर & गँबल..आशिर्वाद, नेस्ले, आई.टी.सी. 
इत्यादी ...कंपन्या डोक्याचा भुगा करतात. यांचं महागडं खाणं खाण्यापेक्षा मानसिक तणावच जास्त होतो. 

अरे आपण एकदा कधीतरी मरणारच आहोत ना ? ☘😁 

नशिब अजून बाजारात अमृत विकायला नाही आलं.🤣 

मजेत रहा, पाहिजे ते, जमेल तसं खात रहा , व्यायाम करा  आनंदात रहा, शरीराला त्याच कार्य करू द्या, मन मारून जगू नका, कामात व्यस्त रहा, समवयस्क , जुन्या बालमित्रांशी संपर्कात रहा. 

Live life Naturally. 
निसर्गाच्या☘🌿🌴🌳🌿 सानिध्यात रहा. 

Your body is Gift of God... 
आयुष्य हे देवानी  
दिलेली सुंदर भेट आहे


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !