व्हॉट्सअॅप वर लवकरच उपलब्ध होणार हे खास फिचर.. कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात !
👌🏼 _*व्हॉट्सअॅप वर लवकरच उपलब्ध होणार हे खास फिचर.. कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात !*_
🔎 _व्हॉट्सअॅप सातत्यानं युझर्ससाठी नवीन फिचर्स आणि सिक्युरिटी फिचर्स लाँच करत असतं. बऱ्याचदा आपल्याला जुन्या मेसेजचा संदर्भ हवा असतो तेव्हा तो मिळत नाही अशावेळी तो शोधणं अधिक कठीण होऊन जातं. यासाठी कंपनीकडून खास फिचर्स लाँच करण्यात येणार आहे. लवकरच आपल्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहे._
🗓️ _त्यामध्ये एका कॅलेंडर आयकॉनला व्हॉट्सअॅप सोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याला हे अॅप वापरताना कॅलेंडर आयकॉन दिसेल. या कॅलेंडरच्या मदतीनं तुम्ही कितीही जुने मेसेज एका मिनिटात शोधू शकणार आहात. तुम्हाला तारीख निवडायची आहे. त्या तारखेला तुम्ही कोणाशी आणि काय बोललात याचे तपशील पाहता येणार आहेत._
💬 _सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू असून सर्वात पहिल्यांदा हे फिचर आयफोन आणि त्यानंतर अँड्रॉइड फोनसाठी लाँच करण्यात येणार आहे. wabetainfo ने दिलेल्या वृत्तानुसार या फिचरवर सध्या काम सुरू आहे. या फिचरचं टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर युझर्सला याचा लाभ घेता येणार आहे._
Comments
Post a Comment
Did you like this blog